Sunday , December 14 2025
Breaking News

दै. कृषिवलतर्फे हळदीकुंकु कार्यक्रमाच्या आयोजनासंदर्भात आढावा बैठक संपन्न

Spread the love

माणगांव (नरेश पाटील) : शुक्रवार दि. 9 एप्रिल रोजी सायंकाळी 04.00 वाजता माणगांव तालुक्यातील गोरेगाव शहर येथे दै. कृषिवलतर्फे महिलांसाठी राजमाता-जिजाऊ मैदान येथे हळदीकुंकु कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रम भव्यदिव्य करण्याकरिता म्हणून माणगांव शहर येथे मंगळवार दि. 29 मार्च रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती येथे सकाळी आढावा बैठक पार पडली. यावेळी शेकापचे माजी सभापती अस्लमभाई राऊत, बाजार समितीचे सभापती संजय पंदेरे, ता. चिटणीस रमेश मोरे, सहचिटणीस राजेश कासारे, ता. खरेदी विक्री संघाच्या चेअरमन निलेश थोरे, सहचिटणीस राजेश कासारे, महेश सुर्वे व्यासपीठावर उपस्थित होते. तसेच शेकापचे कार्यकर्ते बैठकीला मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर सभेचे आयोजन रमेश मोरे यांनी केले.
हळदीकुंकु कार्यक्रमाबाबत जनजागृती करावी, आपापल्या विभागातून जास्तीत जास्त महिलांना निमंत्रित करणे आदी विषयावर चर्चा झाली.
सदर कार्यक्रम हा रायगड, रत्नागिरी तसेच नवी मुंबई येथील जुने वृत्तपत्र असलेल्या दै. कृषिवलतर्फे आयोजित होत आहे. या हळदीकुंकु कार्यक्रममध्ये रमेश मोरे मित्र मंडळाचा मोलाचा सहभाग दिसून येत आहे.
या हळदीकुंकु कार्यक्रमासाठी दै. कृषिवलच्या मुख्य संपादक तथा राज्य शेकापचे चिटणीस व विधान परिषदचे आमदार जयंतभाई पाटील, माजी आमदार पंडितशेठ पाटील, चित्रलेखा पाटीलसह आदी शेकापचे मान्यवर उपस्थित राहणार असल्याचे समजते.
या हळदी कुंकु कार्यक्रमासाठी खास आकर्षण म्हणून टीव्ही वाहिनीतील प्रसिद्ध अभिनेत्री संचिता कुलकर्णी, भाग्यश्री लिमये व स्वरा ठिगले (स्वरदा) हे येणार असल्याची माहिती मिळाली आहे.
शेवटी संजय पंदेरे यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

‘हास्यसम्राट’ मिर्झा रफी अहमद बेग यांचे निधन

Spread the love  मुंबई : महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी, हास्यसम्राट डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *