Sunday , December 14 2025
Breaking News

सोमय्यांनी कायद्यापासून पळून जाऊ नये : संजय राऊत

Spread the love

मुंबई : कुणी किती पैसे गोळा केले, हा पोलीस तपासाचा भाग आहे. माझा त्या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. एका निवृत्त सैनिकाने तक्रार दाखल केली आहे. राजकीय सुडापोटी सोमय्यांवर आरोप केलेले नाहीत. तुम्हाला भीती नसेल तर पोलिसांसमोर हजर व्हायला पाहिजे. सोमय्यांनी कायद्यापासून पळून जाऊ नये. थायलंड, बँकमध्ये पैसे जमा केलेत, अशी अनेक प्रकरणं आहेत. तर परदेशात पैसे कोण स्वीकारात होतं, हे कळलं पाहिजे, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज सांगितले.
विक्रांतचा निधी थायलंडमध्ये कुणी जमा केला, हे लवकरच समोर येईल. आम्ही कंबरेखाली वार करत नाहीत. ईडी आणि सीबीआयच्या धमक्या देत थायलंड आणि बँकॉकमध्ये पैसा जमा केला जात होता, असा आरोपही यावेळी संजय राऊत यांनी सोमय्यांवर केला.
सोमय्या पितापुत्र परदेशात पळून गेल्याची शंका येत आहे. केंद्र सरकारला लाज वाटत असेल, तर त्यांनी सोमय्यांची सुरक्षा काढून टाकावी. सोमय्या भाजपशासित राज्यात लपल्याचा संशय आहे. त्यांचा पुत्र नील गोव्यात किंवा गुजरातमध्ये लपून बसला असावा. सोमय्या पितापुत्र परदेशात पळून गेले असावेत. आता सोमय्याबाबत भाजप नेते का बोलत नाहीत, असा सवालही त्यांनी केला.
140 कोटी रुपये जमा केल्याचे ट्विट सोमय्या यांनी केले आहे. मग त्यांनी गोळा केलेले 711 डबे कुठे गेले? सगळे पैसे निवडणुकीत वापरले आहेत. पैसे पक्षाकडे जमा केल्याचे ते सांगत आहेत; मग भाजपकडे जमा केलेले पैसे कुठे गेले? विक्रांत वाचविण्यासाठी सोमय्या यांनी काय केले. सेव्ह विक्रांतच्या नावे पैसे गोळा केले. विक्रांतच्या नावावर लिलाव मांडून पैसे गोळा करून त्यांनी देशद्रोह केला आहे. त्यांनी 13 वर्षे पैसे वापरले, आतापर्यंत त्यांनी हजारो कोटी उकळले आहेत. आता त्याचा त्यांनी हिशोब द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
उच्च न्यायालयात दाद मागणार : किरीट सोमय्या
जामीन फेटाळल्यानंतर किरीट सोमय्यांनी एक व्हिडिओमधून आपली भूमिका मांडली. माझ्यावरील झालेल्या आरोपासंदर्भात मी उच्च न्यायालयात जाणार असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘हास्यसम्राट’ मिर्झा रफी अहमद बेग यांचे निधन

Spread the love  मुंबई : महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी, हास्यसम्राट डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *