Monday , September 21 2026
Breaking News

पंढरपूर : चैत्री एकादशी! श्री विठ्ठल-रुक्मिणी गाभार्‍यात 700 किलो द्राक्षांची आरास

Spread the love


पंढरपूर : चैत्रीशुध्द एकादशी निमित्त श्री विठ्ठलाची नित्यपुजा मंदिर समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगांवकर यांच्या हस्ते करण्यात आली. तर श्री रुक्मिणी मातेची नित्यपूजा मंदिर समितीचे सदस्य प्रकाश महाराज जवंजाळ यांच्या हस्ते सपत्निक करण्यात आली.
चैत्री एकादशी निमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी गाभार्‍यात 700 किलो द्राक्षांची आरास करण्यात आली आहे. मंदिर समितीच्या वतीने एकादशी निमित्त पदस्पर्श दर्शन रांगेत भाविकांसाठी खिचडी आणि चहाची मोफत व्यवस्था करण्यात आली आहे.
नित्यपूजेस मंदीर समितीचे सहध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर सदस्य माधवी निगडे, शकुंतला नडगिरे यांच्यासह मंदिर समितीचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

जयसिंगपुरात आईने दोन चिमुरड्या मुलांचा जीव घेतला; त्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या

Spread the love  जयसिंगपूर : शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूर शहरात शनिवारी रात्री मन हेलावून टाकणारी घटना …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *