Saturday , April 5 2025
Breaking News

लोकसभा निकालानंतर महाराष्ट्र मंत्रिमंडळाचा विस्तार

Spread the love

 

नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता; महामंडळावरही नियुक्त्या होणार

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठे बदल होण्याची शक्यता असून राज्यात मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यामध्ये काही मंत्र्यांची खाती बदलली जातील, तसेच काही नवीन चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ज्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार नाही असे नेते नाराज होऊ नयेत म्हणून त्यांची वर्णी महामंडळावर लावण्यात येणार आहे.

पालकमंत्रिपदांची आदलाबदल
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर हा बदल केला जाणार असून काही पालकमंत्रीपदांचीही अदलाबदल करण्यात येणार असल्याची माहिती आहे. तसेच ज्या महामंडळावर अद्याप कोणतीही नियुक्ती करण्यात आली नाही त्यावरही नियुक्ती केली जाणार आहे. या संदर्भात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यात प्राथमिक चर्चाही झाल्याची माहिती मिळत आहे.

नवीन चेहऱ्यांना संधी
स्थानिक राजकारण, जातीय समीकरण आणि सध्याची राजकीय परिस्थिती पाहता नवीन चेहऱ्यांना संधी दिलं जाईल. सध्या अनेक मंत्र्यांकडे दोन-तीन खाती आहेत, त्यामध्ये बदल होऊन विधानसभेच्या संख्याबळानुसार त्याचे वाटप केले जाणार असल्याची माहिती आहे.

राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची निवडही प्रलंबित असून त्याचाही निर्णय होणार असल्याची माहिती आहे. ज्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार नाहीत त्यांना महामंडळ देऊन त्यांची नाराजी दूर केली जाणार असल्याची माहिती आहे.

रिक्त असलेले महामंडळ
– सिडको
– ⁠महात्मा फुले महामंडळ
– ⁠आण्णाभाऊ साठे महामंडळ
– ⁠म्हाडा
– ⁠अपंग कल्याण
– ⁠चर्मोद्योग विकास महामंडळा
– ⁠महाराष्ट्र औद्योगीकरण विकास महामंडळ
– ⁠महाराष्ट्र कामगार कल्याण महामंडळ
– ⁠महारष्ट्र राज्य वखार महामंडळ
– ⁠महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग महामंडळ
– ⁠महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ
– ⁠महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ
– ⁠महराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ
– ⁠महिला अर्थिक विकास महामंडळ

About Belgaum Varta

Check Also

कोरटकरला तीन दिवसाची पोलीस कोठडी, कोर्टाबाहेर येताच शिवप्रेमी अंगावर धावून गेले

Spread the love  कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक वक्तव्य करणारा आणि इतिहासतज्ज्ञ इंद्रजीत सावंत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *