Monday , April 14 2025
Breaking News

नागपूरमध्येही हिट अँड रन, भरधाव कारने ९ जणांना चिरडले, दोघांचा मृत्यू

Spread the love

 

नागपूर : पुण्यातील कल्याणीनगर येथील पोर्श कारने धडक देऊन दोघांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच राज्यात आणखीही हिट अँड रनच्या दुर्दैवी घटना घडल्याचे समोर येत आहे. नागपूरमध्येही हिट अँड रनचा आणखी एक प्रकार उघडकीस आला असून भरधाव वेगाने आलेल्या कारने फुटपाथवर झोपलेल्या ९ जणांना चिरडल्याचे समोर आले आहे. या अपघातामध्ये २ मजुरांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये लहान मुलांचाही समावेश असल्याचे समजते. अपघातावेळी आरोपी कारचालक मद्यधुंद अवस्थेत असल्याची माहिती समोर आली असून पोलिसांनी एकाला अटक केली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरच्या दिघोरी नाक्याजवळ काल मध्यरात्री १२.३० च्या सुमारास हा अपघात घडला. रस्त्याच्या कडेला फुटपाथवर झोपलेल्या बंजारा परिवारातील लोकांना या कारने चिरडले. जखमींमध्ये चार महिला, पुरुष आणि लहान मुले असे एकूण ९ जण झोपले होते. त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला असून मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. हा अपघात घडला तेव्हा कारमध्ये ५ जण असल्याची माहिती आहे. त्या सर्वांनी दारू प्यायली होती असा पोलिसांना संशय असून त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून अहवाल आल्यावर खरं काय ते स्पष्ट होईल. याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून भूषण लांजेवार असं आरोपीचं नाव आहे.

प्रत्यक्षदर्शी व्यक्तीच्या सांगण्यानुसार, अपघातावेळी ही कार खूप वेगात होती. कार वेगाने आल्यानंतर घराच्या दिशेने शिरली. या कारमध्ये काही लोक होते. फूटपाथवर बरेच लोक झोपले होते. तर अपघातात काही जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, अपघातानंतर घटनास्थळी एकच खळबळ उडाली. या अपघातामधील जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पोलिसांनी अपघातग्रस्त कार जप्त केली आहे.

About Belgaum Varta

Check Also

दुकाने अधिकृत मार्केटमध्ये हलवावीत; स्थानिकांचा आग्रह

Spread the love  प्रशासन लवकर पावले उचलणार का? – नागरिकांचे लक्ष लातूर (उदगीर) (अविनाश देवकते) …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *