Sunday , July 26 2026
Breaking News

मालगाडीची कंचनजंगा एक्सप्रेसला धडक; पाच जणांचा मृत्यू, २५ जखमी

Spread the love

 

पश्चिम बंगालमध्ये मालगाडीने कंचनजंगा एक्सप्रेसला धडक दिल्याने रेल्वेचा मोठा अपघात झाला आहे. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून २५ जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. आज सकाळी ९ वाजताच्या सुमारास न्यू जलपाईगुडी येथे ही घटना घडली. दरम्यान, मालगाडीने धडक दिल्यानंतर कंचनजंगा एक्सप्रेसचे डबे रुळावरून घसरले होते.

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, ही मालगाडी अगरतलावरून सियालदाह येथे जात होती. यावेळी या मालगाडीने न्यू जलपाईगुडी येथे रुळावर उभ्या असलेल्या कंचनजंगा एक्सप्रेसला जोरदार धडक दिली. ही धडकी इतकी जोरदार होती, की यावेळी कंचनजंगा एक्सप्रेसलाचे काही डबे थेट रुळावरून खाली घसरले.

पाच जणांचा मृत्यू, २५ जखमी
या अपघातात आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला असून २५ जण जखमी झाल्याची अतिरिक्त पोलिस अधिक्षक अभिषेक रॉय यांनी दिली आहे. तसेच या ठिकाणी रेक्यू टीम दाखल झाली असून बचाव कार्य सुरू असल्याचेही त्यांनी सांगितलं.

रेल्वेमंत्र्यांनीही दिली प्रतिक्रिया
दरम्यान, या अपघातानंतर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. न्यू जलपाईगुडी येथे झालेला अपघात दुर्दैवी असल्याचे ते म्हणाले. याबरोबरच या ठिकाणी एनडीआरएफ आणि एसडीआरएफची टीम दाखल झाली असून बचावकार्य सुरू आहे. तसेच जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वरिष्ठ अधिकारीही या ठिकाणी पोहोचले आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.

About Belgaum Varta

Check Also

26 दिवसांनंतर सोनम वांगचुक यांचे उपोषण मागे; केंद्र सरकारच्या आश्वासनानंतर निर्णय

Spread the love  नवी दिल्ली : नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई आणि परीक्षा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *