Tuesday , March 3 2026
Breaking News

शिल्पकार जयदीप आपटेच्या पोलीस कोठडीत वाढ

Spread the love

 

सिंधुदुर्ग : राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती कोसळल्या प्रकरणी बांधकाम विभागाच्यावतीने शिल्पकार जयदीप आपटे आणि सल्लागार चेतन आपटे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. सिंधुदुर्ग पोलिसांनी पहिल्यांदा चेतन पाटील त्यानंतर जयदीप आपटे याला अटक केली होती. आज त्या प्रकरणी सिंधुदुर्ग मधील न्यायालयात सुनावणी झाली होती. आजच्या सुनावणीत जयदीप आपटेला १३ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. तर, चेतन पाटील याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. आजच्या सुनावणीसंदर्भात सरकारी वकील ॲड. तुषार भणगे यासंदर्भात माहिती दिली आहे.

जयदीप आपटेला १३ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी
ॲड. तुषार भणगे म्हणाले की, आरोपी जयदीप आपटे विसंगत माहिती देतोय.त्यामुळे सात दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती,परंतु न्यायालयाने १३ तारखेपर्यंत (तीन दिवसांची)पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपी चेतन पाटील याला न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. नवीन कायद्यानुसार पोलिसांना जेव्हा हा आरोपी हवा असेल त्यावेळी न्यायालयाच्या परवानगीने पोलीस त्याला ताब्यात घेऊ शकतात. जयदीप आपटे याच्याकडून पोलिसांना अधिक माहिती मिळवायची आहे. या प्रकरणातील इतर व्यक्तींची माहिती पोलिसांना मिळवायची असल्यानं सात दिवसांची पोलीस कोठडी मागण्यात आली होती. या प्रकरणात तपासकाम करणे गरजेचे असल्याने न्यायालयाने आमचा युक्तिवाद ग्राह्य धरुन आरोपीला १३ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

दोघांचे कुटुंबीय उपस्थित
जयदीप आपटे आणि चेतन पाटील या आरोपींची पाच दिवसांची कोठडी संपल्यानंतर त्यांना आज मालवण दिवाणी न्यायालयात हजर करण्यात आले. आजच्या सुनावणीला जयदीप आपटे यांची पत्नी आणि आई उपस्थित होती. तर, चेतन पाटील यांचे बंधू ही सुनावणीसाठी न्यायालयात उपस्थित राहिले होते.

About Belgaum Varta

Check Also

अजितदादांच्या विमानाचा अपघात नाही तर घातपात; रोहित पवारांना मोठा संशय

Spread the love  मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा २८ जानेवारीला बारामतीत विमान अपघातामध्ये …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *