Friday , June 5 2026
Breaking News

१५ सप्टेंबरपासून धावणार हुबळी-पुणे वंदे भारत एक्सप्रेस!

Spread the love

 

 

बेळगाव : हुबळी ते पुणे या मार्गावर १५ सप्टेंबरपासून वंदे भारत एक्सप्रेस धावणार आहे. त्यामुळे आता पुणे ते सांगली असा तीन तासांचा प्रवास फक्त ५५ मिनिटांमध्येच पूर्ण होणार आहे. महाराष्ट्रात लवकर विधानसभा निवडणुका असल्यामुळे काही शहरात वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार आहेत.

१५ सप्टेंबर रोजी देशात १० वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार आहेत. यामध्ये पुणे ते हुबळी वंदे भारत एक्सप्रेस समावेश आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटक जलदगतीने रेल्वेने जोडले जाणार आहे. हुबळीहुन पहाटे पाच वाजता सुटणारी वंदे भारत एक्सप्रेस पुण्यात दुपारी दीड वाजता पोहोचणार आहे, तर पुण्याहून हुबळीला दोन वाजून दहा मिनिटांनी निघणारी वंदे भारत एक्सप्रेस रात्री पावणे अकरा वाजता हुबळीला पोहोचेल.

अत्याधुनिक ट्रेन्समुळे प्रवासाचा वेळ वाचणार
भारताच्या रेल्वे कनेक्टिव्हिटीला महत्त्वपूर्ण चालना देण्यासाठी, अनेक नवीन वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यात आल्या आहे. या अत्याधुनिक ट्रेन्समुळे प्रवासाचा वेळ वाचणार आहेत. त्याचप्रमाणे ट्राफिकपासून देखील सुटका मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे. पुणे ते हुबळी आणि पुणे ते सांगली या मार्गावर जलद गाड्या सुरू करण्याची विनंती रेल्वे प्रशासनाकडे अनेक दिवसांपासून केली जात होती. या मागणीचा विचार करून रेल्वे मंत्रालयाने हुबळी ते पुणे आणि पुणे ते हुबळी या मार्गाला मंजुरी दिलीय.

About Belgaum Varta

Check Also

मराठी विद्यानिकेतनमध्ये जागतिक पर्यावरण दिन साजरा

Spread the love  बेळगाव : मराठी विद्यानिकेतनमध्ये दिनांक ५जून २०२६रोजी जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *