मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने २५ उमेदवार अंतिम केली असल्याचे समजते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत बैठकीतील २५ उमेदवारांची नावे ठरली आहे. अजित पवार बारमातीमधूनच लढणार असल्याचे ठरल्याचे सुत्रांनी सांगितले.
महायुतीमध्ये जागावाटपाची चर्चा सुरु आहे. पण त्याआधीच राष्ट्रवादी काँग्रेसने आपले २५ उमेदवार ठरवले आहेत. राष्ट्रवादीच्या अंतर्गत बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला. महायुतीची चर्चा सुरु आहे मात्र तयारी असावी या दृष्टीने आतापासून कामाला लागा असे सांगण्यात आले आहे. अजित पवार बारामतीमधूनच लढणार हे आता जवळपास निश्चित झाले आहे.
कोण असतील उमेदवार?
बारामती : अजित पवार
उदगीर : संजय बनसोडे
आंबेगाव : दिलीप वळसे-पाटिल
दिंडोरी : नरहरि झिरवळ
येवला : छगन भुजबळ
पुसद : इंद्रनील नाइक
वाई खंडाळा महाबळेश्वर : मकरंद आबा पाटिल
पिंपरी : अण्णा बनसोडे
परळी : धनंजय मुंडे
इंदापुर : दत्ता भरणे
रायगड : अदिती तटकरे
कळवण : नितिन पवार
मावळ : सुनील शेळके
अमळनेर : अनिल पाटील
अहेरी : धर्मराव बाबा अत्राम
कागल : हसन मुश्रीफ
खेड : दिलीप मोहिते-पाटील
अहमदनगर : संग्राम जगताप
जुन्नर : अतुल बेनके
वडगाव शेरी : सुनील टिंगरे