बेळगाव : कंग्राळी खुर्द गावच्या पंचक्रोशीतून वाहणाऱ्या मार्कंडेय नदीमध्ये व नदीच्या परिसरात केरकचरा तसेच गणेशोत्सव काळात पूजेचे साहित्य व गणेश विसर्जन दिवशी नदीत किंवा आजूबाजूच्या परिसरात कोणत्याही प्रकारचे पूजेचे साहित्य (हार, केळीची झाडे, डेकोरेशनचे साहित्य) नदीत न टाकता तिथं उभा असलेल्या गाडीत किंवा ट्रॉलीत टाकून सहकार्य करावे. अन्यथा कडक कारवाई करण्याचा इशारा ग्राम पंचायत कंग्राळी खुर्दने दिला आहे. तसेच आज ग्रामपंचायत सदस्यांनी नदीच्या काठावर व पुलावर जो काही कचरा जमा झाला होता तो तिथून हटविला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य प्रशांत पाटील, महेश धामणेकर, वैजू बेन्नाळकर, राकेश पाटील, विनायक कम्मार व ग्राम पंचायत कर्मचारी आनंद कांबळे, राजू कालकुंद्रीकर, आडव्याप्पा कांबळे उपस्थित होते.