ठाणे : ” प्रेयसी एक आठवण ” ही सत्य प्रेम स्वरूप कादंबरी खूप गाजत असून अनेक नामवंतानी वेगवेगळ्या माध्यमातून परीक्षण करून कौतुक केले आहे. या कादंबरीला अल्पावधित चौदा राज्यस्तरीय मराठी वाड्:मय पुरस्कार मिळालेले आहेत. या सत्य प्रेम स्वरूप कादंबरीला वाचकांनी भरभरून प्रतिसाद व दाद दिली आहे. प्रेमाचं आदर्श प्रतिबिंब दर्शवणारी, स्वच्छ प्रेमाचं प्रतिक, ग्वाही देणारी ही नितळ कादंबरी आहे. या सत्य प्रेम स्वरूप कादंबरीवर आधारित लवकर मराठी चित्रपट निघणार आहे.
या कादंबरीवर आधारित चित्रपट काढण्या संदर्भात नामवंत पाच चित्रपट निर्माते व दिग्दर्शकाने संपर्क साधला असून निवडणुका झाल्यानंतर या सत्य प्रेम स्वरूप कादंबरीवर चित्रपट काढण्याबाबत सविस्तर चर्चा व करार करण्यात येणार आहे असे “प्रेयसी एक आठवण” या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक अर्जुन विष्णू जाधव यांनी सांगितले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta