
सोलापूर : सोलापूर शहरातील अक्कलकोट रोड एमआयडीसी परिसरातील सेंट्रल टेक्सटाईल या टॉवेल कारखान्याला भीषण आग लागली होती. या आगीत तीन जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या आगीत आणखी चार ते पाच जण अडकल्याची माहिती मिळाली होती. दरम्यान, मागील 13 तासाहून अधिक वेळ आगीत अडकलेल्या पाच जणांना बेशुद्धवस्तेत अग्निशमाक दलाच्या जवानांनी बाहेर काढलं आहे. या पाचही जणांना सोलापूरच्या शासकीय रुग्णालयाकडे तातडीने रवाना करण्यात आले होते. मात्र, या पाचही जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे या आगीत एकूण 8 जणांचा मृत्यू झाला आहे.
जीव वाचवण्यासाठी मास्टर बेडरुममध्ये लपून बसले
रुग्णसेवक बाबा मिस्त्री यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या लोकांना बाहेर काढलेले आहे ते देखील मृत अवस्थेत आहेत. सेंट्रल इंडस्ट्रीज या कारखान्याला लागलेल्या आगीत एकूण 8 लोकांचा मृत्यू झाला आहे. पहाटे साडेपाच वाजता तीन कामगारांचा मृत्यू झाला होता. सेंटर इंडस्ट्रीजचे मालक ही आतमध्ये अडकल्याची माहिती होती. त्यानुसार शोधकार्य पहाटेपासून सुरू होतं. हे सर्व पाच जण मास्टर बेडरुममध्ये लपून बसले होते. दुर्दैवाने त्यांना बाहेर पडता आला नाही. त्यामुळं श्वास गुदमरून आणि होरपळून त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. सर्व आठही मृतदेह हे सर्व शविच्छेदनासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयाकडे पाठवण्यात आले आहेत.
मृतांची नावे
उस्मान मनसुरी (वय 87), अनस मनसुरी (वय 24), शिका मनसुरी (वय 24), युसूफ मनसुरी (वय 1.6), आयेशा बागबान (वय 45), मेहताब बागवान (वय 21), हिना बागवान (वय 35), सलमान बागवान (वय 18)
उपविभागीय अधिकारी सदाशिव पडदूने यांच्याकडून ही माहिती मिळाली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta