
पुणे : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील आरोपी राजेंद्र हगवणेला आसरा देणाऱ्या ५ जणांना पुणे न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. कर्नाटकातील माजी ऊर्जा मंत्री वीरकुमार पाटील यांचा मुलगा प्रीतम पाटील याची तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे.
प्रीतम पाटीलसह मावळमधील फार्म हाऊस मालक बंडू फाटक, साताऱ्यातील राहुल जाधव, अमोल जाधव, तळेगाव येथील मोहन भेगडे यांनाही न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलीय. वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात आरोपी राजेंद्र हगवणेला आसरा देणाऱ्या पाच जणांना बावधन पोलिसांनी रविवारी अटक केली होती. यात कर्नाटकातील माजी मंत्र्यांच्या मुलाचा देखील समावेश आहे.
त्यावेळी पोलिसांनी न्यायायलाकडे आरोपींना पोलीस कोठडी देण्यात यावी, अशी मागणी केली होती. हगवणे यांना कोणती आर्थिक मदत केली आहे का? हे अजून तपासण्यासाठी पोलिसांनी न्यायालयाला विनंती केली होती. आश्रय द्यायला कोणी मदत केली आहे का? हे तपासायचे आहे, असे देखील पोलीसांनी न्यायालयात सांगितले. मात्र गुन्हा जामीनपात्र असल्यामुळे न्यायालयाने पोलीस कोठडीची मागणी फेटाळत न्यायालयीन कोठडी दिली.

Belgaum Varta Belgaum Varta