Sunday , December 7 2025
Breaking News

बायको नांदायला येत नसल्याने नवऱ्याने ४ मुलांसह आयुष्य संपवले

Spread the love

अहिल्यानगर : अहिल्यानगरमधून ह्रदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे, बायको नांदायला येत नाही म्हणून बापाने आपल्या चार मुलांसह आपले जीवन संपवले आहे. अरुण काळे (वय 30 वर्ष) राहणार चिखली कोरेगाव , तालुका श्रीगोंदा असे आत्महत्या केलेल्या या व्यक्तीचे नाव आहे. अरुण काळे यांनी आधी आपल्या चार मुलांना विहिरीत ढकलून मग स्वत: आमहत्या केल्याचे समोर आले आहे, या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की ही घटना अहिल्यानगर जिल्ह्यातल्या राहाता तालुक्यातील कोहाळे शिवरात घडली आहे. अरुण काळे यांनी आधी आपल्या चार मुलांना विहिरीत ढकलले आणि त्यानंतर स्वत: आत्महत्या केली. समोर आलेल्या माहितीनुसार बायको नांदायला येत नाही, म्हणून त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती समोर येत आहे. त्यांनी आपली एक मुलगी आणि तीन मुलांसह आत्महत्या केली आहे.

शिवानी अरुण काळे (वय 8), प्रेम अरुण काळे (वय 7), वीर अरुण काळे (वय 6), कबीर अरुण काळे (वय 5) अशी या घटनेतील मृतांची नावे आहेत. तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे तर आणखी दोघांचा शोध सुरू आहे. एक पाय आणि एक हात दोरीने बांधलेल्या अवस्थेमध्ये अरुण काळे यांचा मृतदेह विहिरीत आढळून आला आहे.

बायकोसोबत वाद

समोर आलेल्या माहितीनुसार अरुण काळे यांचा आठ दिवसांपूर्वी त्यांच्या पत्नीशी वाद झाला होता, या वादामुळे त्यांची पत्नी आठ दिवसांपूर्वीच आपल्या माहेरी येवला येथे गेली होती. मात्र बायको घरी येत नसल्याने त्यांनी टोकाचे पाऊल उचल्याची माहिती समोर येत आहे, आधी त्यांनी आपल्या चारही मुलांना विहिरीत ढकलले आणि नंतर त्यांनी विहिरीत उडी घेतली असावी असा अंदाज आहे.

दरम्यान विहिरीपासून काही अंतरावर काळे यांची मोटर सायकल आढळली आहे. श्रीगोंदा येथून अरुण काळे हे आपल्या चार मुलांसह मोटारसायकलवर राहाता तालुक्यातील को-हाळे शिवारात आले होते, को-हाळे शिवारात शिर्डी – नगर बायपासच्या कडेला मोटरसायकल लावून ते विहिरीपर्यंत गेले असावेत असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

About Belgaum Varta

Check Also

दाऊद इब्राहिम दहशतवादी नाही; प्रसिद्ध अभिनेत्री ममता कुलकर्णीचे वादग्रस्त वक्तव्य

Spread the love  मुंबई : गेल्या काही वर्षांपासून ममता अध्यात्माकडे वळलेली अभिनेत्री ममता कुलकर्णी पुन्हा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *