Sunday , July 26 2026
Breaking News

पंतवाड्यात पंत जन्माष्टमी मोठा उत्साहात साजरी

Spread the love

 

बेळगाव : समादेवी गल्लीतील श्री पंतवाडा येथे शनिवारी पंत जन्माष्टमी मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावाने साजरी करण्यात आली. याप्रसंगी पहाटे श्री पंत घराण्याचे वंशज परमपूज्य रंजन पंत परमपूज्य राजन संजीव पंत, रोहन पंत, श्रीवत्स कुलकर्णी यांच्या हस्ते पंत जन्मोत्सवाची पूजा करण्यात आली. सकाळच्या सत्रात सकाळी पारंपरिक भजन, यमुनाक्का महिला मंडळाचे भजन, ज्येष्ठ गायिका सीमा कुलकर्णी यांचे भजन, योगेश रामदास यांचे गायन, श्री पंत भक्त मंडळ भजन, त्यानंतर रंजन पंत, राजन पंत, संजीव पंत, रोहन श्रीवत्स कुलकर्णी यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. त्यानंतर महाप्रसादाला प्रारंभ झाला. दुपारच्या सत्रात पुन्हा भजन, श्रींचा जन्मकाळ पाळणा, यमुनाक्का महिला मंडळातर्फे जीवनप्रवास चित्रफित, अनावरण कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. याप्रसंगी यमुनाक्का महिलावर्गाचे टिपरी नृत्य कार्यक्रम मोठा भक्तीभवानी साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीता पाटील यांनी केले. हा कार्यक्रम पार पडण्यासाठी अनंत किल्लेकर, डॉ. महेंद्र राणे, भारत भूषण सायनाकर, राजू पावशे, समीर कांगले, वैभव सायनाकर, गजानन महाडिक, अवधूत सायनाकर, आणि सुनंदा किल्लेकर, मनीषा पावशे, उमा कांगले, वदंना मुतकेकर, संजीवनी पाटील, सुषमा सायनाकर आदी महिला सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. आज हजारो भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव सीसीबीची धडक कारवाई; खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गांजासह अटकेत

Spread the love    गोव्यातून गांजा आणून विक्रीचा प्रयत्न; १.७०४ किलो गांजा, मोबाईल जप्त बेळगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *