Sunday , April 5 2026
Breaking News

मंत्री नरहरी झिरवाळ पुन्हा अडचणीत, तृतीय पंथीयासोबतचा आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल

Spread the love

 

मुंबई : महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषधी प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ पुन्हा अडचणीत आले आहेत. नरहरी झिरवाळ यांचा कथित आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये झिरवाळ यांच्यासोबत एक तृतीयपंथी व्यक्ती असल्याचा दावा त्या व्यक्तीच्या भावाने पत्रकार परिषद घेत केला. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर खळबळ उडाली असून आता पुन्हा राजकारण तापले आहे. हा संपूर्ण प्रकार मंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी झाला असल्याची माहिती समोर आली आहे.

नरहरी झिरवाळ यांच्या या व्हिडिओनंतर विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी नरहरी झिरवाळ यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. २ महिन्यापूर्वी झिरवाळ यांच्या कार्यालयातील लिपिकाला ३५ हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले होते. यावेळी विरोधकांनी राजीनाम्याची मागणी केली होती. मात्र आता पुन्हा एकदा आक्षेपार्ह व्हिडीओमुळे झिरवाळ अडचणीत आलेत. पुन्हा त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. तृतीयपंथी पवन यादव हा मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासोबत या आक्षेपार्ह स्थितीत दिसत आहे. पवन यादववर मुंबईतल्या कुरार पोलिस ठाण्यामध्ये खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल आहे.

नरहरी झिरवाळ आणि पवन यादव यांचा आक्षेपार्ह व्हिडीओ सात महिन्यांपूर्वीचा आहे. या व्हिडीओमध्ये शासकीय निवासस्थानी पवन यादव आणि मंत्री नरहरी झिरवाळ हे दोघे बेडवर असून त्यांच्याजवळ दारू आणि खाद्यपदार्थ आहेत. या व्हिडीओने पुन्हा राजकारणात खळबळ उडाली आहे. आता नरहरी झिरवाळ यांच्यावर काय कारवाई केली जाणार हे पाहणे महत्वाचे आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मंगळवारी झिरवाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. नरहरी झिरवाळ हे नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार आहेत.

About Belgaum Varta

Check Also

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाची निर्णायक लढाई; रायगडातून सह्यांच्या मोहिमेला गती

Spread the love  रायगड (नरेश पाटील) : दीर्घकाळ प्रलंबित राहिलेल्या महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाची लढाई आता निर्णायक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *