भारताचे माजी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक धावपटू तसेच फ्लाईंग सीख म्हणून ओळखले जाणारे 91 वर्षीय मिल्खासिंग यांचे चंदीगडमधील एका खाजगी रुग्णालयात निधन झाले.
मिल्खा सिंग यांच्या रक्तातील ऑक्सिजनची पातळी कमी झाल्याने त्यांना गुरुवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अतिदक्षता विभागात दाखल केलेल्या मिल्खा सिंग यांची प्रकृती स्थिर असल्याचे त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या पथकाने सांगितले होते. आज त्यांचा मृत्यू झाला. काही दिवसापूर्वी त्यांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यावेळी त्यांना उपचारासाठी इस्पितळात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना 31 मे रोजी मोहालीच्या फोर्टिस इस्पितळातून डॉक्टरांनी घरी जाण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर ते कोविड मार्गदर्शक सूचना पाळत सेक्टर -8 मधील निवासस्थानी विश्रांती घेत होते.
3 जून रोजी गुरुवारी पुन्हा त्यांना त्रास जाणवला. त्यांच्या रक्तातील ऑक्सिजनची पातळी कमी झाल्याने त्यांना चंदीगड येथील एका खासगी इस्पितळात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. त्यांचा आज मृत्यू झाला.
मिल्खासिंग यांच्या पत्नी निर्मला कौर यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना न्युमोनियाचा त्रास जाणवत असल्याने त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. मिल्खासिंग यांचे चिरंजीव गोल्फपटू जीव मिल्खा सिंग यांनी ही माहिती दिली आहे.
फ्लाईंग सिख मिल्खासिंग यांच्या जीवनावर आधारित “भाग मिल्खा भाग” हा चित्रपट काढण्यात आला होता.