Saturday , October 19 2024
Breaking News

महाराष्ट्रासह चार राज्यांमधील पोटनिवडणुकीत भाजपची पिछाडी

Spread the love


नवी दिल्ली : पश्चिम बंगालमधील लोकसभेची एक आणि महाराष्ट्र, छत्तीसगड, बिहार राज्यातील विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपला धक्का बसला आहे. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रसने तर महाराष्ट्र, छत्तीसगड काँग्रेसने तर बिहारमध्ये आरजेडीने बाजी मारली आहे. या निवडणूक निकालाकडे देशाचे लक्ष वेधले होते.
पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसची बाजी
पश्चिम बंगालमधील आसनसोल लोकसभा मतदारसंघातून तृणमूल काँग्रेसचे उमेदवार शत्रुघ्न सिन्हा यांनी तर बालीगंज विधानसभा मतदारसंघातून बाबुल सुप्रिया यांनी निर्णायक आघाडी घेतली आहे. आसनसोलचे भाजप खासदार बाबुल सुप्रियो यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे येथे निवडणूक घेण्यात आली. राज्यमंत्री सुब्रत मुखर्जी यांच्या निधनामुळे बालीगंजर विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक झाली. दोन्ही मतदारसंघात तृणमूल काँग्रेसच्या उमेदवारांची विजयाची औपचारिक घोषणा बाकी असताना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ट्विट करत नागरिकांचे आभार मानले आहेत.
बिहारमध्ये आरजेडीचे वर्चस्व
बिहारमधील बोचहा विधानसभा मतदारसंघात लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) उमेदवारी अमर पासवान विजयी झाले आहे. येथे मुसाफिर पासवान यांचे मृत्यू झाल्यानंतर पोटनिवडणूक घेण्यात आली होती. रिंगणात 13 उमेदवार होते. आरजेडीचे उमेदवार अमर पासवान यांना 82 हजार 116 मते मिळाली तर भाजपच्या बेवी कुमारी यांना 45 हजार 353 मतांवर समाधान मावावे लागले. आरजेडीच्या अमेदवाराने तब्बल 36 हजार मतांनी विजय मिळवला आहे.
महाराष्ट्र, छत्तीसगडमध्ये काँग्रेसचा डंका
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या जयश्री जाधव विजयी झाल्या आहेत. त्यांनी भाजपच्या सत्यजीत कदम यांचा पराभव केला. छत्तीसगडमधील राजनांदगांव जिल्ह्यातील खैरागड विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या यशोदा शर्मा यांनी निर्णायक आघाडी घेतली आहे. याच्या विजयाची औपचारिक घोषणा होणे बाकी आहे.

About Belgaum Varta

Check Also

गोमंतकीय कवी नवनाथ मुळवी आणि मानसी जामसंडेकर यांना ‘अभिजात मराठी भाषा काव्यगौरव पुरस्कार’

Spread the love  मोरणा कवी कट्टा समूह सांगली, पश्चिम महाराष्ट्र यांच्या वतीने “माय मराठी: अभिजात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *