Monday , December 23 2024
Breaking News

पुणे बॉम्बस्फोट प्रकरण; महाराष्ट्र एटीएसने संशयित दहशतवाद्याच्या घरावर चिकटवली नोटीस

Spread the love

 

बंगळूर : महाराष्ट्रातील पुणे येथील दहशतवादी कारवाया प्रकरणातील आरोपी असलेल्या तरुणाच्या घरावर मुंबई एटीएसच्या पथकाने नोटीस चिकटवल्याची माहिती आहे. आरोपी भटकळ येथील नवायत कॉलनीत रहात असल्याच्या माहितीवरून एटीएस पथक भटकळला आले होते.
महाराष्ट्राचे दहशतवाद विरोधी पथक २००८ च्या पुणे बॉम्बस्फोट प्रकरणात दहशतवादी अब्दुल कबीर कादीरचा शोध घेत आहे. कादीर गेल्या एक वर्षापासून फरार होता. वृत्तानुसार, महाराष्ट्र न्यायालयाच्या नोटीसच्या आधारे एटीएसचे पथक त्याला अटक करून चौकशीसाठी हजर करण्यासाठी भटकळमध्ये दाखल झाले आहे.
मूळचा भटकळ नवयत कॉलनी हाजी मंझील येथील रहिवासी असलेला अब्दुल कादिर सुलतान उर्फ ​​मौलाना सुलतान याच्या संशयावरून पुण्यात कलम १० आणि १३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच्यावर २१ जून रोजी जिल्हा व सत्र न्यायालयात खटला दाखल करण्यात आला आहे.
भटकळ येथे शोध घेणाऱ्या पथकाने अखेर त्याच्या घरावर नोटीस चिकटवण्यात आल्याचे समोर आले आहे. त्या नोटीसवर ६ जूनची तारीख चिकटवली होती. महाराष्ट्र एटीएसचे पथक त्याच्या शोधात भटकळच्या घरी गेले आणि तो घरी नसल्यामुळे त्यांनी नोटीस लावली.
२००८ च्या पुणे बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी अब्दुल कबीर कादीर सुलतान उर्फ ​​मौलाना सुलतान हा गेल्या अनेक वर्षांपासून फरार असून तो वारंवार भटकळला येत असल्याची माहिती एटीएसला आहे.
त्यामुळे मुंबई एटीएसचे पथक १० जून रोजी भटकळ येथे दाखल झाले आणि त्यांनी २१ जून रोजी पुणे न्यायालयात होणाऱ्या सुनावणीला उपस्थित राहण्याच्या सूचना देणारी नोटीस त्यांचे घर, तहसीलदार कार्यालय आणि नगरपालिकेच्या सूचना फलकावर चिकटवली.

About Belgaum Varta

Check Also

सुप्रसिद्ध तबला वादक झाकीर हुसैन काळाच्या पडद्याआड

Spread the love  नवी दिल्ली : २०२४ वर्ष संपता संपता एक दु:खद बातमी हाती आली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *