नवी दिल्ली : लोकसभा अध्यक्षपदासाठी आज संसदेत आवाजी मतदान पार पडले. यामध्ये भाजप प्रणित रालोआचे उमेदवार ओम बिर्ला निवडून आले आहेत. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार के. सुरेश यांचा पराभव केला आहे. बिर्ला यांच्या नावाला तब्बल १३ पक्षांनी पाठिंबा दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः बिर्ला यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला होता. दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभा अध्यक्षपदासाठी के. सुरेश यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला होता. त्यांच्या प्रस्तावाला इंडिया आघाडीच्या खासदारांनी पाठिंबा दिला. ओम बिर्ला यांना १३ पक्षांनी मतदान केले. तर दुसरीकडे के. सुरेश यांच्या नावाला कमी पक्षांनी पसंती दिली. त्यामुळे लोकसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ओम बिर्ला निवडून आले. दरम्यान, लोकसभा अध्यक्षपदी निवड होताच पंतप्रधान मोदी आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी परंपरेनुसार ओम बिर्ला यांना सभापतींच्या खुर्चीवर आसनस्थ केले.
आता ओम बिर्ला सलग दुसऱ्यांदा लोकसभा अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारणार आहेत. दुसरीकडे बिर्ला यांची निवड होताच प्रोटेम स्पीकर भृथरी महताब यांना प्रोटेम स्पीकरच्या जबाबदारीतून मुक्त करण्यात आलं.
दरम्यान, लोकसभेचे विरोधीपक्षनेते राहुल गांधी यांनी नवनिर्वाचित लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचे अभिनंदन केले.
Belgaum Varta Belgaum Varta