
लुधियाना : मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास झोपडीला लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील सात जणांचा होरपळून मृत्यू झाला. यामध्ये पाच मुलांचा समावेश आहे. घटनेत मृत्युमुखी पडलेले कुटुंब बिहारमधील समस्तीपूप जिल्ह्यातील बोगापूर गावातील असल्याचे पोलीस उपनिरीक्षक बलदेव राज यांनी सांगितले आहे. आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप समोर आलेले नाही.
सुरेश (54), रौर देवी (50), राखी (15), मनीषा (10), चंदा (8), गीता (6) आणि मुलगा सनी (2) अशी घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. मृत बिहारमधील समस्तीपूर जिल्ह्यातील बोगोपूर गावातील असल्याचे पोलिसांनी सांगितले.
बलदेव राज यांनी सांगितले की, घटनेत मृत्युमुखी पडलेले कुटुंब स्थलांतरित मजूर असून, ते येथील टिब्बा रोडवरील महापालिकेच्या कचरा डंप यार्डजवळ एका छोट्याशा झोपडीत राहत होते. दरम्यान, मंगळवारी (दि. 20) मध्यरात्री दोनच्या सुमारास हे कुटुंब गाढ झोपेत असताना अचानक आग लागली. त्यात या सर्वांचा होरपळून मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. झोपडीमध्ये चिंध्या, प्लास्टिक इतर साहित्य मोठ्या प्रमाणात असल्याकारणाने आग मोठ्या प्रमाणात पसरली आणि त्यातच या कुटुंबातील पाच मुलांसह सात जणांचा होरपळून मृत्यू झाला.
Belgaum Varta Belgaum Varta