नवी दिल्ली : रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती स्थिर आहे आणि ते घरीच आराम करत आहेत. माजी उपपंतप्रधान आणि भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना काल (5 जुलै) सायंकाळी पाच वाजता दिल्लीतील अपोलो रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. 96 वर्षीय अडवाणी यांची प्रकृती खालावल्याने बुधवारी रात्री 9 वाजता त्यांना रुग्णालयात आणण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालयाने बुलेटिन जारी केले होते. ते न्यूरोलॉजिस्ट डॉ. विनीत सुरी यांच्या निरीक्षणाखाली होते.
सात दिवसांपूर्वी आधी 26 जून रोजी अडवाणींना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी त्यांना यूरोलॉजी विभागाचे डॉ. अमलेश सेठ यांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले. अडवाणी यांच्यावर किरकोळ शस्त्रक्रिया झाल्याची माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली होती. दुसऱ्या दिवशी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.
Belgaum Varta Belgaum Varta