Sunday , December 7 2025
Breaking News

सहा मजली इमारत कोसळून ७ जणांचा मृत्यू, सुरतमधील घटना

Spread the love

 

सूरत : गुजरातच्या सूरतमध्ये सहा मजली इमारत कोसळून सात जणांचा मृत्यू झाला. या ठिकाणी ढिगारा उपसण्याचे काम सुरु आहे. काही लोक अडकले असण्याची भीती या ठिकाणी व्यक्त करण्यात येते आहे. या ठिकाणी मदत आणि बचावाकार्य सुरु आहे. एनडीआरएफ आणि एसडीआरएफ या दोन्हीची पथके या ठिकाणी कार्यरत आहेत.

घटनास्थळी महापौरांची धाव
घटनेची माहिती मिळताच सूरत महापालिकेचे महापौर दक्षेज मावानी, उपमहापौर नरेंद्र पाटील, भाजपा आमदार संदीप देसाई आणि विरोधी पक्षाच्या नेत्या पायल साकरिया यांच्यासह इतर नेत्यांनीही घटनास्थळाला भेट दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सूरतमधल्या साचिन भागात सहा मजली इमारत कोसळली. या घटनेत सात जणांचा मृत्यू झाला. मदत आणि बचावकार्य सुरु असून ढिगार्‍याखाली लोक अडकले असण्याची भीती आहे. आत्तापर्यंत तीन मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. एएनआयने हे वृत्त दिलं आहे.

About Belgaum Varta

Check Also

रूग्णवाहिकेने घेतला पेट, नवजात बाळासह चौघांचा होरपळून मृत्यू

Spread the love  अहमदाबाद : रूग्णवाहिकेने पेट घेतल्याने नवजात बाळासह चार जणांचा होरपळून मृत्यू झाला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *