नवी दिल्ली : मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन येत्या 23 जुलै रोजी सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी सरकार मोठी घोषणा करणार असल्याची माहिती समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पीएम किसान सन्मान निधीतील रक्कम 30 टक्क्यांनी वाढवून सुमारे 80,000 कोटी रुपये केले जाणार आहेत.
अंतरिम अर्थसंकल्पात सरकारने पीएम किसान सन्मान निधी योजनेसाठी 60,000 कोटी रुपयांची तरतूद केली होती, ज्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्याला 6,000 रुपये वार्षिक भत्ता मिळणार होता. आता मिळालेल्या माहितीनुसार, जूनच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या बैठकीत कृषी प्रतिनिधींनी अर्थमंत्र्यांना या योजनेतील रक्कम प्रति शेतकरी 8,000 रुपये करण्याची मागणी केली आहे. त्यानुसार या योजनेतील रक्कम वाढवली जाणार आहे.
Belgaum Varta Belgaum Varta