Sunday , December 7 2025
Breaking News

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबार

Spread the love

 

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर शनिवारी पेनसिल्व्हेनिया येथे एका प्रचार कार्यक्रमात बोलत असताना एका अज्ञात हल्लेखोराने त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. “माझ्या उजव्या कानाच्या वरच्या भागाला मला गोळी चाटून गेली”, ट्रम्प यांनी काही वेळातच सोशल मीडियावर ही माहिती दिली.

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पेनसिल्व्हेनियामध्ये प्रचार रॅलीला संबोधित करत होते. त्यावेळी हा हल्ला करण्यात आला. रॅलीमध्ये अनेक शॉट्स वाजल्याने डोनाल्ड ट्रम्प लागलीच व्यासपीठाच्या मागे लपले.

गोळीबाराचा आवाज येताच डोनाल्ड ट्रम्प यांच्या कानाला चाटून गोळी गेली. त्यामुळे ते पटकन खाली कोसळले. जमावामध्ये निर्माण झालेल्या दहशतीदरम्यान, गुप्तहेर खात्याने लगेच डोनाल्ड ट्रम्प यांना सुरक्षित केले. त्यांच्या चेहऱ्याच्या उजव्या बाजूला रक्ताचे डाग दिसत होते. ते उभे राहून हात उंचावताच गर्दीतून आवाज आला. त्यानंतर काही वेळातच ते तेथून निघून गेले. सीक्रेट सर्व्हिस आणि ट्रम्पच्या कार्यालयाने ते सुरक्षित असल्याचं सांगितलं आहे.

रॉयटर्स वृत्तसंस्थेनुसार, प्रचारसभेत गोळीबाराचा चारवेळा आवाज आल्याचं एका समर्थकाने सांगितलं. त्यामुळे गोळीबाराचा आवाज येताच सगळेजण खाली वाकले. “मी सुमारे चार शॉट्स ऐकले आणि मी बघितले की जमाव खाली वाकला आणि नंतर ट्रम्प देखील लगेच खाली वाकले. मग सीक्रेट सर्व्हिसने शक्य तितक्या लवकर त्यांचे संरक्षण केले. एका सेकंदात हे सर्व घडलं”, असं या प्रत्यक्षदर्शीने सांगितलं. एक व्यक्ती पळून जात असताना लष्करी गणवेशातील अधिकारी त्याचा पाठलाग करत होता. त्यावेळीही गोळ्यांचा आवाजा ऐकू आला. परंतु त्यांना कोणी गोळ्या घातल्या हे अस्पष्ट आहे, असेही प्रत्यक्षदर्शी म्हणाला.

About Belgaum Varta

Check Also

रूग्णवाहिकेने घेतला पेट, नवजात बाळासह चौघांचा होरपळून मृत्यू

Spread the love  अहमदाबाद : रूग्णवाहिकेने पेट घेतल्याने नवजात बाळासह चार जणांचा होरपळून मृत्यू झाला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *