Sunday , September 8 2024
Breaking News

मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं!

Spread the love

 

नवी दिल्ली : मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड झाल्याने जगभरातील यूजर्सना अडचणींचा सामना करावा लागतो आहे. अनेकांचे संगणक आणि लॅपटॉप अचानक बंद पडत असून त्यावर निळ्या रंगाची स्क्रीन दिसत आहे. यामुळे जगभरातील बॅंका आणि विमानतळांचं कामदेखील खोळंबलं आहे. महत्त्वाचे म्हणजे मायक्रोसॉफ्टनेही या घटनेची दखल घेतली असून याबाबत आम्ही माहिती घेत असल्याचे कंपनीने म्हटलं आहे.

पोस्ट शेअर करत यूजर्सनी केली तक्रार
एक्स या समाजमाध्यावर पोस्ट शेअर करत अनेक यूजर्सने याबाबत तक्रार केली आहे. काम करत असताना अचानक त्यांचे लॅपटॉप बंद पडत असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. तसेच तुमचा संगणक अडचणीत असून रिस्टार्ट करणे आवश्यक आहे, असे संदेश स्क्रीनवर येत असल्याचेही या यूजर्सने सांगितले आहे. क्राऊड स्क्राइक अपडेटनंतर येत आहे, ही समस्या येत असल्याची तक्रारही काही यूजर्सद्वारे करण्यात करण्यात आली आहे.

मायक्रोसॉफ्टनेही घेतली दखल
दरम्यान, मायक्रोसॉफ्टने या तक्रारींची दखल घेतली आहे. एक्स या समाज माध्यमावर पोस्ट करत मायक्रोसॉफ्टने यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड झाल्याने जगभरातील संगणक आणि लॅपटॉप प्रभावित झाले आहेत. आम्ही याची दखल घेतली असून याबाबत माहिती घेत आहोत. लवकर ही सेवा पूर्ववत करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे कंपनीने म्हटलं आहे.

क्राऊडस्ट्राईककडून निवेदन जारी
क्राऊडस्ट्राईकने यासंदर्भात निवेदन जारी केलं आहे. आम्ही या तक्रारींची माहिती घेत असून जोपर्यंत पुढील सुचना येत नाही, तोपर्यंत वाट यूजर्सनी वाट बघावी, असे त्यांनी या निवेदनात म्हटलं आहे. याबरोबरच विंडोजवर चालणाऱ्या संगणकांमध्ये बीएसओडीची समस्या निर्माण झाली असून यूजर्सनी स्वत:हून या समस्येचं निराकरण करण्याचा प्रयत्न करू नये, अशी सुचनादेखील त्यांनी केली आहे.

विमान व बँकिंग सेवा प्रभावित
मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत झालेल्या या बिघाडाचा फटका भारतासह जगभरातील बँका आणि विमान सेवेलाही बसला आहे. मुंबईसह देशभरातील अन्य काही महत्त्वाच्या विमानतळांवर सर्व्हर ठप्प झाल्याची माहिती आहे. त्यामुळे प्रवाशांनाही अनेक अडचणींचा सामना करावा लागतो आहे. स्पाईसजेटनेही विमानसेवा ठप्प झाल्याचे म्हटलं आहे. विमानसेवेबरोबरच बँकांचे व्यवहारदेखील ठप्प झाले आहेत.

About Belgaum Varta

Check Also

सिक्कीममध्ये सैन्य दलाचे वाहन दरीत कोसळून ४ जवानांचा जागीच मृत्यू

Spread the love  नवी दिल्ली : सिक्कीमध्ये गुरुवारी भारतीय सैन्य दलाचे वाहन ७०० ते ८०० …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *