Wednesday , March 4 2026
Breaking News

जम्मू- काश्मीरमध्ये तीन टप्प्यात मतदान तर हरियाणामध्ये 1 ऑक्टोबरला मतदान

Spread the love

 

नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाने आज (दि. 16 ऑगस्ट) हरियाणा आणि जम्मू- काश्मीरमधील विधानसभा निवडणुकीची घोषणा केली. जम्मू-काश्मीरमध्ये 18 सप्टेंबर, 25 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबर तीन टप्प्यांत मतदान होईल. तर हरियाणामध्ये 1 ऑक्टोबरला एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. तर दोन्ही राज्यात 4 ऑक्टोबरला मतमोजणी होईल, अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

पुढे बोलतना राजीव कुमार म्हणाले, जम्मू काश्मीरमध्ये १० वर्षांनी विधानसभा निवडणूक होत आहे. येथील लोक निवडणुकांसाठी उत्साही आहेत. घाटी नागरिकांनी बुलेट, बायकॉट नाही, तर बॅलेट पेपर निवडले आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये एकूण 90 विधानसभा मतदारसंघ आहेत, त्यापैकी 74 सर्वसाधारण, SC-7 आणि ST-9 आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये एकूण 87.09 लाख मतदार असतील. ज्यामध्ये 44.46 लाख पुरुष, 42.62 लाख महिला, 3.71 लाख प्रथमच मतदार आणि 20.7 लाख तरुण मतदार आहेत. यासाठी 11 हजार 833 मतदान केंद्रे उभारण्यात आल्याचेही राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत बोलताना स्पष्ट केले.

हरियाणामध्ये 2.1 कोटी एकूण मतदार
हरियाणामध्ये एकूण 90 विधानसभा मतदारसंघ आहेत. यामध्ये एकूण 2.1 कोटी एकूण मतदार आहेत. 1 कोटी 6 हजार पुरूष, तर 95 लाख महिला मतदार आहे. 4 लाख 52 हजार युवा मतदार आहेत. यासाठी 20 हजार 629 मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत.

About Belgaum Varta

Check Also

लग्नाला जाताना काळाचा घाला! वऱ्हाडींची बस दरीत कोसळून १३ जणांचा मृत्यू

Spread the love  उत्तराखंड : नेपाळ सीमेजवळ भयंकर रस्ते अपघात झाला. लग्नाला निघालेल्या वऱ्हाडींची बस …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *