नवी दिल्ली : लोकसभेनंतर राज्याच्या राजकारणात विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. राज्यात काही दिवसांत विधानसभा निवडणुकांची घोषणा होईल अशी शक्यता वर्तवली जात होती. पण महाराष्ट्रामध्ये दिवाळीनंतरच विधानसभेच्या निवडणुका होतील, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.
यावेळी केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांबाबत महत्वाचे संकेत दिले आहेत. महाराष्ट्रात पाऊस झाला होता, त्यामुळे अनेक गोष्टी बाकी आहेत. गणेश उत्सव, दसरा, दिवाळी हे महाराष्ट्रात पुढील काही दिवसांत सण-उत्सव आहेत. लवकरच महाराष्ट्राच्या निवडणुका जाहीर करूयात,” असे निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितले आहे. तसेच “सुरक्षा पुरवण्याचा कारणावरून महाराष्ट्र आणि हरियाणा या राज्यांच्या निवडणुकासोबत घेतल्या नाहीत, असेही निवडणूक आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे राज्यातील विधानसभा निवडणुका आता दिवाळीनंतरच होतील, असे संकेत मिळत आहेत. त्यामुळे राज्यात विधानसभा निवडणुकांचा धुरळा सध्यातरी लांबणीवर गेल्याचे स्पष्ट होत आहे.