Wednesday , March 4 2026
Breaking News

नेपाळमध्ये नदीपात्रात बस कोसळून महाराष्ट्रातील 14 भाविकांचा मृत्यू

Spread the love

 

जळगाव : महाराष्ट्रातील 40 पर्यटकांसह निघालेली प्रवासी बस नदीपात्रात कोसळून नेपाळमध्ये भीषण दुर्घटना घडली आहे. या अपघातात राज्यातील 14 प्रवाशांना प्राण गमवावे लागल्याची दुर्दैवी माहिती समोर आली आहे. हे सर्व भाविक भुसावळचे आहे. यामध्ये 31 जण जखमी झाले असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. नदीपात्रात बस कोसळल्यामुळे बचावकार्य आव्हानात्मक झाले आहे.

जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील रणगाव, पिंपळगाव, तळवेल, या गावातले सर्व भाविक होते. घटनेची माहिती मिळताच गावात अतिशय शोकाकूल वातावरण आहे. गावातील भाविक हे 16 ऑगस्टपासून अयोध्या नेपाळ काठमांडू देवदर्शनासाठी गेले होते. 16 ते 28 ऑगस्टपर्यंत असा यांचा प्रवास होतो.एकूण दोन लक्झरी बस नेपाळला गेल्या होत्या. गावावर दु:खाचा डोंगर कोसळला असून नातेवाईकांनी टाहो फोडला आहे.

भुसावळमधील 104 लोकांचा गट 10 दिवसांच्या दौऱ्यासाठी नेपाळला
भारताच्या महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील भुसावळ गावातून 104 लोकांचा एक गट 10 दिवसांच्या दौऱ्यासाठी दोन दिवसांपूर्वी नेपाळमध्ये आला होता. हा गट तीन बसमधून प्रवास करत होता आणि त्यांनी पहिले दोन दिवस पोखराला भेट दिली. शुक्रवारच्या दिवशी काठमांडूसाठी रवाना झालेल्या या तीन बसपैकी एक बस मार्स्यांगडी नदीत दुर्घटनाग्रस्त झाली. सशस्त्र पोलिस बल कुरिंतरचे प्रमुख माधव प्रसाद पौडेल यांनी सांगितले की, या तीनही बसमध्ये बहुसंख्य प्रवासी हे कुटुंबातील सदस्य आणि नातेवाईक होते.

About Belgaum Varta

Check Also

लग्नाला जाताना काळाचा घाला! वऱ्हाडींची बस दरीत कोसळून १३ जणांचा मृत्यू

Spread the love  उत्तराखंड : नेपाळ सीमेजवळ भयंकर रस्ते अपघात झाला. लग्नाला निघालेल्या वऱ्हाडींची बस …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *