Tuesday , March 3 2026
Breaking News

तेलंगणात पोलीस चकमकीत सहा नक्षलवादी ठार

Spread the love

 

हैदराबाद : तेलंगणातील भद्राद्री कोठागुडेम जिल्ह्यात गुरुवारी पोलीस आणि नक्षलवादी यांच्यात झालेल्या गोळीबारात दोन महिलांसह सहा नक्षलवादी ठार झाले. बेकायदा माकप या संघटनेचे ते सदस्य होते. गोळीबारात तेलंगणा पोलिसांच्या नक्षलविरोधी दलातील दोन कमांडोही जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांचाी प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले.

काराकागुडेम पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोथे गावाच्या जंगल परिसरात सकाळी ६.४५ च्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. सशस्त्र नक्षलवाद्यांनी गस्तीवर असलेल्या पोलीस दलावर बेछूट गोळीबार केला, असे पोलिसांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

नक्षलवाद्यांना गोळीबार थांबवण्याचा इशारा देण्यात आला. मात्र नक्षलवाद्यांचा गोळीबार न थांबल्याने पोलीस दलानेही प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला. नक्षलवाद्यांकडून गोळीबार थांबल्यानंतर पोलीस दलाने परिसराची झडती घेतली असता सहा मृतदेह सापडले. मृत झालेले सहाही जण नक्षलवादी संघटना असलेल्या बेकायदा माकपचे सदस्य होते, असे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी घटनास्थळावरून शस्त्रास्त्रे जप्त केली आहेत.

About Belgaum Varta

Check Also

लग्नाला जाताना काळाचा घाला! वऱ्हाडींची बस दरीत कोसळून १३ जणांचा मृत्यू

Spread the love  उत्तराखंड : नेपाळ सीमेजवळ भयंकर रस्ते अपघात झाला. लग्नाला निघालेल्या वऱ्हाडींची बस …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *