मुंबई : भारतीय चित्रपटसृष्टीतील जगातील सर्वात प्रतिष्ठेचा ७० व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा आज ८ ऑक्टोबर २०२४ रोजी पार पडला. ऑगस्ट महिन्यात राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा झाली होती. हा कार्यक्रम विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे संपन्न झाला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्व विजेत्यांना सन्मानित केलं. यंदाचा सर्वात प्रतिष्ठेचा दादासाहेब फाळके पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना प्रदान करण्यात आला.दादासाहेब फाळके पुरस्कार स्वीकारल्यानंतर मिथुन चक्रवर्ती मनोगत व्यक्त करत स्वतःच्या कारकिर्दीचा अनुभव सांगत,अभिनयक्षेत्रात दिसण्यावरून त्यांना लोकांनी मारलेले टोमणे, त्याचबरोबर खचून न जाता स्वतःचं स्थान इंडस्ट्रीमध्ये निर्माण करण्याच्या स्ट्रगलबद्दल सांगितलं आणि सर्वांचे आभार मानले. मिथुन स्वतःचं मनोगत व्यक्त करत म्हणाले की, ‘सुरुवातीला जेव्हा मला कळलं मला दादासाहेब फाळके पुरस्कार मिळणार आहे तेव्हा मला खूप आनंद झाला होता आणि माझा विश्वास बसत नव्हता.’ त्याचबरोबर युवा पिढीला संदेश देत म्हणाले की, ‘या जगात अनेक युवा अभिनेते असे आहेत ज्यांच्यामध्ये कला आहे पण त्यांची परिस्थिती नाहीये जशी माझीही नव्हती पण त्यांनी हार न मानता स्वप्न नक्की बघा आणि ती पूर्ण करण्याच्या दिशेने वाटचाल करा.असा संदेश त्यांनी दिला