सीकर : राजस्थानमधील सीकर जिल्ह्यात मंगळवारी दुपारी एक भीषण अपघात झाला. यात १२ जणांचा मृत्यू झाला तर २० जखमी झालेत. लक्ष्मण गड परिसरात लक्ष्मण गड कल्व्हर्टवर प्रवाशांनी भरलेली खासगी बसचा अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार, खासगी बस अनियंत्रित झाली आणि पुलाच्या कठड्याला धडकली. यात बसचं मोठं नुकसान झालं. चालकाच्या बाजूचे मोठे नुकसान झाले. या अपघातात १२ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर २० हून अधिक जण जखमी झाले आहेत. या बसमध्ये जवळपास ४० जण प्रवास करत होते.
पोलिसांना अपघाताची महिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना लक्ष्मण गड आणि सीकर येथील रुग्णालयात दाखल केलं. तर मृत झालेल्या व्यक्तींना पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहे. हा अपघात कसा झाला याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. सीकर येथील पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात मंगळवार दुपारी २ वाजता झाला. प्रत्यक्षदर्शींच्या मते, बस अचानकपणे अनियंत्रित झाली.
पुलावर येताच बस इकडून तिकडे होते होती, त्याचवेळी बस पुलाच्या कठड्याला धडकली. त्यामुळे बसच्या एका बाजुचं मोठे नुकसान झाले. या अपघातानंतर बसमध्ये बसलेल्या प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडालीय. घटनास्थळी उपस्थित लोकांनी तातडीने पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली आणि घटनास्थळी बचावकार्य सुरू केले आहे.
सुचना मिळाल्यानंतर सीकरचे पोलीस उपायुक्त शाहीन सी आणि अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी रतन कुमार हे घटनास्थळी दाखल झाले असून पोलीस तपास केला जात आहे. पोलीस निरीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातात आतापर्यंत १२ जणांचा प्रवास २० पेक्षा अधिक लोक जखमी झालेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.