Monday , December 8 2025
Breaking News

आगरा-लखनऊ एक्सप्रेस-वे पर स्कॉर्पियोचा भीषण अपघात; पाच डॉक्टरांचा जागीच मृत्यू

Spread the love

 

नवी दिल्ली : लग्नावरुन परतणाऱ्या डॉक्टरांच्या स्कार्पियो कारचा एक्सप्रेस वे वर भीषण अपघात होऊन पाच डॉक्टरांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी पहाटे तीनच्या सुमारास घडली. प्रचंड वेगात असलेली स्कॉर्पियो कार डिवायडर तोडून पलटी झाली. त्याचवेळी मागून वेगात आलेला ट्रक या कारला धडकला. अपघात इतका भीषण होता की, स्कॉर्पियोमधील पाच डॉक्टरांचा जागीच मृत्यू झाला. हे सर्व डॉक्टर्स सैफई मेडिकल यूनिवर्सिटीमध्ये प्रॅक्टिस करत होते. उत्तर प्रदेशच्या कन्नौजमध्ये आगरा-लखनऊ एक्सप्रेस-वे पर हा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत मरण पावलेले सर्व डॉक्टर्स सैफई मेडिकल यूनिवर्सिटीमधून पीजीचा अभ्यास करत होते. माहिती मिळताच पोलिसांसोबत युनिवर्सिटीचा स्टाफ घटनास्थळी पोहोचला. पोलिसांनी सांगितलं की, सकाळी चारच्या सुमारास कंट्रोल रुमला अपघाताची माहिती मिळाली.

अपघातात मरण पावलेल्या पाचही डॉक्टरांची ओळख पटवण्यात आली आहे. डॉ.अनिरुद्ध वर्मा, डॉ.संतोष कुमार मौर्य, डॉ.जयवीर सिंह, डॉ अरुण कुमार आणि डॉ. नरदेव अशी या डॉक्टरांची नाव आहेत. हे सर्व डॉक्टर लखनऊ लग्नासाठी गेले होते. तिथून परतत असताना भीषण अपघात झाला. डॉक्टरांची वेगात असलेली स्कॉर्पियो कार डिवायडर तोडून रस्त्याच्या पलीकडे गेली. त्याचवेळी मागून वेगात आलेल्या ट्रकने कारला धडक दिली.

प्राथमिक चौकशीतून काय समोर आलं?

पोलीस या अपघाताची चौकशी करत आहेत. ड्रायव्हरच्या डोळ्यावर झोप असल्याने हा अपघात झाल्याच प्राथमिक चौकशीतून समोर आलं आहे. या स्कॉर्पियोचा नंबर ८० एचबी ०७० आहे. ज्या ट्रकची धडक बसली, त्याचा नंबर आरजे ०९ सीडी ३४५५ आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या भीषण अपघाताची दखल घेतली. सीएम योगी यांनी या भीषण अपघाताबद्दल दु:ख व्यक्त केलं. त्यांनी अधिकाऱ्यांना तात्काळ घटनास्थळी पोहोचून मदतकार्य वेगाने करण्याचे निर्देश दिले आहेत.

About Belgaum Varta

Check Also

रूग्णवाहिकेने घेतला पेट, नवजात बाळासह चौघांचा होरपळून मृत्यू

Spread the love  अहमदाबाद : रूग्णवाहिकेने पेट घेतल्याने नवजात बाळासह चार जणांचा होरपळून मृत्यू झाला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *