नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांची काल रात्री दिल्लीत भेट झाली. महाराष्ट्रातील मुख्यमंत्रिपदाबाबत अमित शाह यांनी विनोद तावडे यांना बोलावून घेतले होते. यावेळी मराठा चेहरा नसल्यास होणाऱ्या परिणामांविषयी अमित शाह यांनी विनोद तावडे यांच्यासोबच चर्चा केल्याची सूत्रांनी माहिती आहे.
मुख्यमंत्रिपदाचा चेहऱ्याबाबत अमित शाह यांनी घेतला आढावा
मराठा समाज आणि मुख्यमंत्रिपदाचा चेहरा याबाबत केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी आढावा घेतला. भाजपची महाराष्ट्रात सत्ता आल्यापासून म्हणजेच 2014 ते 2024 पर्यंत मराठा समाजाची आंदोलन, कोर्टाचे निकाल, मराठा नेत्यांची भूमिकेचा आढावा घेतला. भवितव्याच्या दृष्टीनं मराठा चेहरा किती महत्वाचा आहे. याबाबत सर्व गणितांची मांडणी करण्यात आली. आगामी निवडणुका, देवेंद्र फडणवीसांचा चेहरा आणि मराठा, ओबीसीचा मतांबाबत चर्चा झाली.