Monday , December 8 2025
Breaking News

आरबीआयकडून शेतकऱ्यांना गिफ्ट; विना तारण दोन लाखांचे कर्ज

Spread the love

 

बेळगाव : भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीने आज झालेल्या बैठकीत शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला. आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी याविषयीची घोषणा केली. वाढत्या महागाईत शेतकऱ्यांना मदतीसाठी आता विना तारण दोन लाख रुपयांचे कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सध्या शेतकर्‍यांना विना तारण 1.6 लाखांचे कर्ज देण्यात येते. आता ही मर्यादा दोन लाख रुपये करण्यात आली आहे. तर दुसरीकडे आज आरबीआयने ग्राहकांना निराश केले. त्यांनी 11 व्या वेळा रेपो रेटमध्ये कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे रेपो रेट 6.5 टक्क्यांवर कायम राहीला.

शेतकऱ्यांना मोठा दिलासा

आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी महागाईचा आढावा घेतला. महागाईचा विचार करता कृषीसाठी उपयोगात येणाऱ्या कच्चा मालाच्या खर्चात वाढ झाल्याचे समोर आले. त्यामुळे विना तारण शेतकी कर्ज मर्यादा 1.6 लाखावरून 2 लाख रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे वित्तीय संस्थाकडून कर्जाची व्याप्ती वाढेल. आरबीआयने 2010 मध्ये कृषी क्षेत्रात विना तारण एक लाख रुपये कर्ज देण्याची मर्यादा निश्चित केली होती. 2019 मध्ये ही मर्यादा 1.6 लाख रुपये करण्यात आली. आता त्यात अजून 40 हजारांची वाढ करण्यात आली आहे.

About Belgaum Varta

Check Also

रूग्णवाहिकेने घेतला पेट, नवजात बाळासह चौघांचा होरपळून मृत्यू

Spread the love  अहमदाबाद : रूग्णवाहिकेने पेट घेतल्याने नवजात बाळासह चार जणांचा होरपळून मृत्यू झाला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *