Sunday , December 7 2025
Breaking News

कझाकिस्तानमध्ये विमान कोसळून 42 जणांचा मृत्यू

Spread the love

 

कझाकिस्तान : कझाकिस्तानच्या अकताऊ एअरपोर्टवर विमान कोसळल्याची दुर्घटना घडली. रिपोर्ट्सनुसार, या विमानातून १०० पेक्षा जास्त प्रवाशी प्रवास करत होते. त्यामधील ४२ जणांचा मृत्यू झाला. तर आतापर्यंत १२ जणांना वाचवण्यात यश आले आहे. घटनास्थळी सध्या बचावकार्य युद्धपातळीवर केले जात आहे. लँडिंगवेळी विमान कोसळल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. विमानाचे दोन तुकडे झाल्याचे व्हिडीओत दिसत आहे. या घटनेमुळे अकताऊ एअरपोर्टवर खळबळ उडाली आहे. अपघातग्रस्त विमानत रशियाच्या चेचन्याहून बाकू ते ग्रोजनी या मार्गावर जात होते. पण ग्रोजनीमध्ये अतिप्रमाणात धुके असल्यामुळे मार्गात बदल करावा लागला. अजरबॅजन एयरलाइन्सकडून या अपघातावर अद्याप कोणतेही अधिकृत विधान आलेले नाही. कझाकिस्तान सरकारच्या हवाल्याने एपीने या दुर्घटनेत आतापर्यंत ४२ जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली आहे.
भीषण दुर्घटनेत काही जणांचा जीव गमावला असला तरी अनेकजण जिवंत असल्याचे समजते. कझाकिस्तानमधील मंत्रालयानं याबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितलं की आपत्कालीन सेवांसाठीची मदत पथके (अग्निशामन) दुर्घटनास्थळी आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत. विमान क्रॅशचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखे व्हायरल झाले आहेत.

अजरबॅजन एअरलाइनची फ्लाइट क्रमांक ८२४३  मध्ये १०५ प्रवासी, चालक आणि क्रू मेंबरसह ११० जण होते. अकताऊ एअरपोर्टवरपासून साधारणपणे ३ किलोमीटर अंतरावर आपत्कालीन लँडिंग करावं लागले. कझाकिस्तानमधील अधिकाऱ्यांनी सांगितलं की, तांत्रिक समस्येसह अपघाताचं कारण शोधलं जात आहे. अग्निशमन दलाच्या पथकाने विमान दुर्घटनानंतर लागलेली आग विझवली आहे. ज्या लोकांना वाचवण्यात आलं त्यांच्यावर जवळच्या रूग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत.

About Belgaum Varta

Check Also

रूग्णवाहिकेने घेतला पेट, नवजात बाळासह चौघांचा होरपळून मृत्यू

Spread the love  अहमदाबाद : रूग्णवाहिकेने पेट घेतल्याने नवजात बाळासह चार जणांचा होरपळून मृत्यू झाला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *