
दक्षिण कोरिया : लँडिंगवेळी एअरपोर्टवरच विमान क्रॅश झाले अन् दुर्घटना घडली. १८१ प्रवाशंना घेऊन जाणारे विमानात अचानक आग लागली अन् ते कोसळले. यामध्ये आतापर्यंत ६७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. गेल्या आठवड्यात कझाकिस्थानमध्ये झालेली विमान दुर्घटना ताजी असतानाच दक्षिण कोरियातही विमान लँडिंगवेळी दुर्घटना झाली.
दक्षिण कोरियामधील दक्षिण-पश्चिमी परिसरातील मुआन विमानतळावर रविवारी विमान कोसळले. त्यामध्ये आतापर्यंत ६७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. मृताची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. जखमींना जवळच्या रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेय. विमान लँडिंग करताना झालेल्या अचानक ब्लास्ट झाला, त्याचा आवाज मुआनमध्ये जोरदार घुमला अन् नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
स्थानिक अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, जेजू एअरचे प्रवासी विमान मुआन आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरत असताना धावपट्टीवरून घसरले. विमानात अचानक ब्लॅस्ट झाला अन् आग लागली. त्यामुळे लँडिंगवेळी विमानात घसरले अन् दुर्घटना घडली. मुआन अग्निशमन विभागाचे अधिकारी ली सेओंग-सिल यांनी सांगितले की, आतापर्यंत दुर्घटनाग्रस्त विमानातून ६७ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अग्निशामन दलाकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आणखी मृताचा शोध घेतला जात आहे.
Belgaum Varta Belgaum Varta