Sunday , January 5 2025
Breaking News

26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्यातील तहव्वुर राणा याला भारतात आणणार

Spread the love

 

नवी दिल्ली : 26/11 मुंबई दहशतवादी हल्ला भारतीय विसरले नाहीत. या हल्ल्यातील पाकिस्तान वंशांचा कॅनडातील व्यापारी तहव्वुर राणा याला लवकरच भारताकडे सोपवण्यात येणार आहे. भारतीय कुटनीतीचा हे मोठं यश मानण्यात येत आहे. त्याला भारतात आणण्यासाठी आता कायदेशीर बाबींसोबतच राजकीय संबंधांचा वापर करण्यात येत आहे. अमेरिकन कोर्टाने राणाची याचिका फेटाळल्यानंतर त्याला मोठा झटका बसला होता. ऑगस्ट 2024 मध्ये अमेरिकन न्यायालयाने प्रकरणात फैसला सुनावला होता. भारत-अमेरिका या दोन्ही देशांमधील प्रत्यार्पण संधी अंतर्गत त्याला भारताला सोपवण्यास न्यायालयाने मंजूरी दिली होती. त्यातंर्गतच आता राणाला लवकरच भारतात आणण्याच्या हालचालींना वेग आला आहे.

राणावरील आरोप काय?

मुंबई हल्ल्यात तहव्वुर राणा याचा हात असल्याचे मुंबई पोलिसांनी सांगितले होते. दोषारोपपत्रात सुद्धा त्याचे नाव आहे. तो पाकिस्तानच्या इंटर सर्व्हिसेज इंटेलिजेंस (आयएसआय) आणि दहशतवादी संघटना लष्कर-ए-तयब्बाचा सक्रिय सदस्य असल्याचा त्याच्यावर आरोप आहे. मुंबई हल्ल्यातील मास्टरमाईंड डेव्हिड कोलमॅन हेडली याला राणा याने या हल्ल्यासाठी मदत केल्याचे तपासात समोर आले होते. त्याने हल्ल्यापूर्वी मुंबईतील काही ठिकाणांची रेकी केली होती, असा आरोप आहे.

हल्ल्याच्या एका वर्षानंतर अटक

26/11 मुंबई हल्ल्यानंतर एका वर्षानंतर एफबीआयने शिकागो येथून राणा याला अटक केली होती. राणा आणि त्याचा मित्र डेव्हिड कोलमन हेडली या दोघांनी मुंबईतली हल्ल्याच्या ठिकाणांची रेकी केली होती. त्यानंतर दहशतवाद्यांनी हे हल्ले केल्याचे तपासात समोर आले होते.

अमेरिकन कोर्टाने भारत आणि अमेरिका यांच्यातील प्रर्त्यापण करारात राणा याला नियमांच्या अपवादाचा लाभ देता येणार नाही असे स्पष्ट केले होते. अमेरिकन न्यायालयात राणा विरोधात जो खटला सुरू आहे, तो भारतातील खटल्यांपेक्षा वेगळा असल्याचे मत कोर्टाने व्यक्त केले होते. त्यामुळे नॉन बिस इन आयडम बाबत आरोपीने केलेला युक्तीवाद कोर्टाने ग्राह्य धरला नाही. ऑगस्ट 2024 मध्ये अमेरिकन न्यायालयाने प्रकरणात फैसला सुनावला होता. भारत-अमेरिका या दोन्ही देशांमधील प्रत्यार्पण संधी अंतर्गत त्याला भारताला सोपवण्यास न्यायालयाने मंजूरी दिली होती. त्यातंर्गतच आता राणाला लवकरच भारतात आणण्याच्या हालचालींना वेग आला आहे.

About Belgaum Varta

Check Also

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Spread the love    नवी दिल्ली : भारताचे माजी पंतप्रधान आणि देशाचे थोर अर्थशास्त्रज्ञ डॉ. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *