पणजी : समक्य दर्शन राज्यस्तरिय साहित्य समूह सोलापूर महाराष्ट्र राज्य आयोजित काव्यलेखन स्पर्धा. महाराष्ट्राचा उत्कृष्ट कवी/कवयित्री स्पर्धा क्र. १४ चा निकाल घोषितसमूह संस्थापक – देविदास गायकवाड व सुनिता तागवान.प्रशासिका – सुजाता उके. महाराष्ट्राचे उत्कृष्ट कवी ठरले आहेत मा.नवनाथ रामकृष्ण मुळवी, गोवा तर महाराष्ट्राची उत्कृष्ट कवयित्री ठरल्या आहेत मा.वैशाली सुर्यवंशी, जिल्हा नाशिक सोलापूर. सम्यक दर्शन साहित्य राज्यस्तरीय समूहात स्पर्धा घेतली जाते. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून यावेळी ‘ज्ञानज्योती माता सावित्रीमाई फुले’ ह्या विषयावर स्पर्धा घेण्यात आली होती. पहिल्या महिला शिक्षिका, पहिल्या मुख्याध्यापिका, समाजसुधारक, सावित्रीमाई यांचे कार्य, कर्तृत्व आणि थोरवी आपल्या शब्दांत मांडून अनेक कवी कवयित्रींनी एकापेक्षा एक सरस रचना लिहिल्या. स्पर्धेत महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील कवी आणि कवयित्री मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. “सम्यक दर्शन साहित्य राज्यस्तरीय मंच” यांचे तर्फे काव्यलेखन स्पर्धा क्र. १४ ही ३० डिसेंबर २०२४ ते ३ जानेवारी २०२५ या दरम्यान घेण्यात आली होती. या काव्यलेखन स्पर्धेत यावेळी, “महाराष्ट्राचा उत्कृष्ट कवी” म्हणून मा. नवनाथ रामकृष्ण मुळवी,गोवा हे विजयी ठरले आहेत. त्यांचे शिक्षण एम.काँम पर्यंत झाले आहे. कवी विविध साहित्य समूहात सातत्याने लेखन करीत आहेत. आजवर अनेक प्रातिनिधिक काव्यसंग्रहात त्यांच्या कविता प्रसिद्ध झाल्या आहेत. कविता, निबंध लेखन, चारोळी लेखन, अलक लेखन, तसेच बातम्या लिहायची कवीला आवड आहे. ४०० च्या वर सन्मानपत्र त्यांना प्राप्त असून त्यांना आजवर अनेक आँनलाईन व आँफलाईन पुरस्कार प्राप्त आहेत.या स्पर्धेत महाराष्ट्राची उत्कृष्ट कवयित्रीचा सन्मान कवयित्री मा. वैशाली प्रविण सुर्यवंशी, जिल्हा नाशिक यांना प्राप्त झाला आहे. कवयित्री बी. ए. इतिहास असून अनेक वर्षांपासून अनेक साहित्य प्रकारात त्यांचे लिखाण आहे. अनेक समूहात त्यांचे लिखाण सुरू आहे. त्या भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच नाशिक जिल्हाध्यक्ष पदी नियुक्त असून उत्तर महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदी कार्यरत आहेत. उत्कृष्ट ग्राफिक्सकारा म्हणून त्यांची ख्याती आहे. त्यांचे अनेक माध्यमातून साहित्य प्रसिद्ध आहे. ७०० हून अधिक सन्मानपत्र त्यांना प्राप्त असून अनेक आँनलाईन व आँफलाईन पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. दोन्ही कवींचे समूहाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले व भविष्यकालीन वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. सम्यक दर्शन साहित्य समूहाचे संस्थापक देविदास गायकवाड तसेच सौ. सुनिता तागवान हे आहेत तसेच सुजाता उके ह्या प्रशासिका आहेत.