Sunday , December 7 2025
Breaking News

छत्तीसगडमध्ये 20 नक्षलवादी ठार, एकावर तर 1 कोटीचा इनाम

Spread the love

 

 

गडचिरोली : महाराष्ट्रासह छत्तीसगड आणि नक्षल प्रभावित जिल्ह्यातून ही कीड हटवण्यासाठी व्यापक मोहिम हाती घेण्यात आली आहे. छत्तीसगड पोलीस आणि सीआरपीएफ कडून सुरू असलेला कोम्बिंग ऑपरेशन सुरू आहे. 36 तास उलटूनही अजूनही ही चकमक सुरूच आहे. छत्तीसगडमधील दक्षिण बस्तर जिल्ह्यात आणि इतर ठिकाणी सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यात धुमश्चक्री सुरू आहे. घनदाट जंगलात आज पहाटे 5 ते 5:30 वाजेदरम्यान चकमक उडाली. यामध्ये 20 नक्षलवाद्यांना सुरक्षा दलांनी कंठस्नान घातले आहे. बिजापूर, सुकमा-तेलंगाणा बॉर्डरवर पण नक्षल्यांना टिपण्यात आले आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रासह आंध्रप्रदेशाच्या सीमावर्ती भागत सुद्धा नक्षलवाद्यांची व्यापक शोध मोहीम हाती घेण्यात आली आहे.

नक्षलवाद्यांची मोठी फळी निकामी

गेल्या काही वर्षात राष्ट्रविरोधी नक्षलवादी मोहिमेचे कंबरडे मोडण्यासाठी सुरक्षा दलांनी व्यापक मोहीम हाती घेतली आहे. स्थानिक पोलीस आणि खबऱ्यांच्या मार्फत नक्षलवादाविरोधात आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे. सध्या उडालेल्या चकमकीत नक्षल चळवळीला मोठा झटका बसला आहे. या चकमकीत मोठे कॅडरचे नक्षलवादी ठार झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. काल रात्री एक वाजेपासून हे कोम्बिंग ऑपरेशन सुरू झाले. पहाटे साडेपाच वाजेपर्यंत चकमक चालली. आताही चकमक सुरू असल्याचे समोर येत आहे.

एक कोटी रुपयांचं बक्षीस असलेला चलपती ठार

छत्तीसगड चकमकीत एक कोटी रुपयांचं बक्षीस असलेला जहाल माओवादी चलपती ठार झाला आहे. उडीसा राज्यातील स्टेट कमिटीच्या चीफ म्हणून नक्षलवादी संघटनेमध्ये तो पदावर होता. चलपती हा जवळपास 30 वर्षापासून नक्षल चळवळीत सहभागी होता.

या चकमकीत दोन महिलाही कॅडर नक्षलवादी ठार झाल्या. एक एसएलआर रायफल, अम्बुंश व ईडी स्फोटके घटनास्थळावरून जप्त करण्यात आले आहे. छत्तीसगड पोलीस सीआरपीएफ आणि इंटरेस्टेड पोलीसांच्या मदतीने ऑपरेशन यशस्वी झाले आहे.

About Belgaum Varta

Check Also

रूग्णवाहिकेने घेतला पेट, नवजात बाळासह चौघांचा होरपळून मृत्यू

Spread the love  अहमदाबाद : रूग्णवाहिकेने पेट घेतल्याने नवजात बाळासह चार जणांचा होरपळून मृत्यू झाला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *