वेर्णा : वेर्णा औद्योगिक वसाहतीत भीषण आग लागल्याची घटना उघडकीस आली. वेर्णातील रेनो आणि स्कोडाच्या सर्व्हिस सेंटरला ही आग लागल्याने, जवळपास 30 कार जळून खाक झाल्याची माहिती समोर आली आहे. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल होत, आगीवर नियंत्रण मिळवले आहे.
गवताला लागलेली आग पुढे पसरून बस जळल्याची घटना नुकतीच कुचेलीत घडली होती. त्याची पुनरावृत्ती मंगळवारी (21 जानेवारी) वेर्णा येथे झाली. ‘रेनो’ कंपनीच्या कार पार्क केलेल्या मैदानावर सुक्या गवताला आग लागून 30 गाड्या भस्मसात झाल्या.
याबाबत अधिक माहिती अशी की, रेनो कंपनीचे शोरुम वेर्णा येथे आहे. त्यांच्या नवीन कार समोरील मैदानात पार्क केलेल्या असतात. दुपारच्या सुमारास मैदानावरील सुक्या गवताला आग लागली. ती पसरत कार पार्क केलेल्या जागी पोहोचली व कारनीही पेट घेतला. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत नियंत्रण आणण्याचे प्रयत्न सुरू केले. परंतु 30 हून अधिक कार आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. त्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta