Tuesday , March 3 2026
Breaking News

पाकिस्तानी सैन्याच्या तुकडीवर हल्ला, बस जळून खाक; पाकचे 90 जवान ठार

Spread the love

 

इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये बलूच आर्मी आणि पाकिस्तानी सैन्यात घमासान पाहायला मिळत असून बलूच आर्मीने पाकिस्तानची ट्रेन हायजॅक केल्यानंतर पाकिस्तानी सैन्यानेही ठोक भूमिका घेतल्याचं दिसून येत आहे. बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी सैन्य दलावर हल्ला करण्यात आला असून बीएलए म्हणजे बलूच आर्मीने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. या हल्ल्यात 90 पाकिस्तानी सैन्य जवानांना ठार करण्यात आल्याचा दावा बीएलएकडून करण्यात येत आहे. त्यामुळे, पाकिस्तान आणि बीएलए यांच्यातील रणसंग्राम अधिक तीव्र झाल्याचं दिसून येत आहे. दरम्यान, बीएलएने पाकिस्तानमधील जाफर एक्सप्रेस हायजॅक केल्यानंतर पाकिस्तानी आर्मीने ऑपरेशन रावबून बलूच आर्मीतील 30 जवानांना ठार करत ट्रेनमधील ओलीस ठेवलेल्या प्रवाशांची सुटका केली होती. त्यानंतर, बलूच आर्मीने प्रत्युत्तरादाखल पाकिस्तानी कॅम्पवर हल्ला चढवला आहे. या हल्ल्यात बस जळून खाक झाली असून बसमधील जवान ठार झाल्याने पुलवामा हल्ल्याची पुनरावृत्ती झाल्याचं बोललं जात आहे.

द बलुचिस्तान पोस्टच्या वृत्तानुसार, पाकिस्तानी सैन्याच्या कॅम्पवर नोशिकी येथे हल्ला करण्यात आला आहे. आरसीडी हायवेवर पाकिस्तानी सैन्य दलाच्या तुकडीवर बलूच आर्मीकडून हा हल्ला करण्यात आल्याची स्थानिक सूत्रांची माहिती आहे. येथे सुरुवातीला काही स्फोट झाले, त्यानंतर मोठ्या प्रमाणात गोळीबाराची घटना घडली आहे. या हल्ल्यानंतर सुरक्षा रक्षक आणि रुग्णवाहिकांनी घटनास्थळी धाव घेतली असून रुग्णालयातही जमर्जन्सीचा इशारा देण्यात आला आहे. पाकिस्तानी सैन्य दलाच्या तुकडीवर करण्यात आलेल्या हल्ल्याची जबाबदारी बीएलएने स्वीकारली आहे. बलूच आर्मीचे प्रवक्ता जीयंद बलूच यांनी याबाबत माहिती दिली. बीएलएची फियादीन तुकडी मजीद ब्रिगेडने काही तासांपूर्वी नोकिशी येथे आरसीडी हायवेवर पाकिस्तानी सैन्य दलाच्या तुकडीला लक्ष्य केले. या तुकडीत 8 पाकिस्तानी सैन्य दलाच्या बसेसचा समावेश होता. त्यापैकी, एक बस पूर्णपणे नेस्तनाबू झाली आहे. या हल्ल्यात पाकिस्तानी सैन्याचे 90 जवान ठार झाल्याचा दावाही बलूच आर्मीकडून करण्यात येत आहे.

About Belgaum Varta

Check Also

लग्नाला जाताना काळाचा घाला! वऱ्हाडींची बस दरीत कोसळून १३ जणांचा मृत्यू

Spread the love  उत्तराखंड : नेपाळ सीमेजवळ भयंकर रस्ते अपघात झाला. लग्नाला निघालेल्या वऱ्हाडींची बस …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *