
पणजी : श्रीमती हायस्कूल वेळगे-गोवा येथे गोव्याचे भाग्यविधाते, गोव्याचे पहिले मुख्यमंत्री आणि बालकृष्ण बांदोडकर एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक कै. श्री. दयानंद (भाऊसाहेब) बांदोडकर यांच्या ११४ व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.
पणजी येथील जुन्या सचिवालयात भाऊसाहेब बांदोडकर यांच्या जयंतीनिमित्त पुष्पांजली अर्पण करून त्यांच्या महत्त्वपूर्ण कार्याचा सन्मान करण्यात आला. या निमित्ताने शाळेत वेळगे गावातील जेष्ठ नागरिकांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री. नवनाथ रा. मुळवी,(कवि, साहित्यिक, शिक्षक), सन्माननीय अतिथी सौ. सपना पार्सेकर (सरपंच,वेळगे पंचायत), विशेष निमंत्रित सत्कार मुर्ती–मा. सौ. अनुजा साळगांवकर,मा. श्री. हनुमंत घाडी,मा. श्री. रामकृष्ण धोंड,आणि मा. श्री. पांडुरंग पार्सेकर. सिद्धार्थ बांदोडकर हायर सेकंडरीचे प्रा.उदय मांद्रेकर, भारती प्रायमरी स्कूलचे मा.श्री.दिप्तेश सावंत तसेच श्रीमती हायस्कूल पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष श्री. गोविंद गावकर, सिद्धार्थ बांदोडकर उच्च माध्यमिक विद्यालय पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष मा.श्री.धनश्याम कदम व भारती प्रायमरी स्कूल पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष मा.श्री.विजय जोग तसेच मोठ्या संखेने पालकवर्ग आणि इतर नागरीक आवर्जून हजर झाले होते.
सौ. अनुजा साळगांवकर यांचा सत्कार वेळगे गावच्या संरपंचा मा.सपना नितीन पार्सेकर यांच्या हस्ते करण्यात आला, तर मा. श्री. हनुमंत घाडी,मा. श्री. रामकृष्ण थोंड आणि मा. श्री. पांडुरंग पार्सेकर यांचा सत्कार प्रमुख पाहुणे मा.श्री.नवनाथ रामकृष्ण मुळवी यांच्या हस्ते करण्यात आला.
प्राथमिक व माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांनी भाऊसाहेब बांदोडकर यांच्या जीवनकार्यावर मनोगत व्यक्त केले.
कू.. अद्वैत एस. मुळगावकर (इयत्ता तिसरी)कू. तनसी मराठे (इयत्ता नववी-ब)कू. सेजल नाईक (इयत्ता नववी-ब) तसेच नवनाथ मुळवी यांनी भाऊंचे जिवन चरीत्र आपल्या काव्यरचनेद्वारे सादर केले. तसेच सत्कारमूर्तींनी आपले मनोगत व्यक्त केले.
हा कार्यक्रम मुख्याध्यापिका श्रीमती चित्रा परांजपे, सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालक-शिक्षक संघाच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडला. सुत्र संचालन शिक्षिका अन्नपुर्णा जोग यांनी केले तर शेवटी शिक्षिका त्रिशा सावंत यांनी आभारप्रदर्शन केले.
Belgaum Varta Belgaum Varta