
छत्तीसगड : छत्तीसगडमधील सुकमा आणि दांतेवाडा सीमा परिसरात नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये जोरदार चकमक सुरू आहे. या चकमकीदरम्यान दोन्हींकडून सातत्याने गोळीबार सुरू असून, यात माओवाद्यांना जबर नुकसानीचा सामना करावा लागला आहे. आतापर्यंत सुमारे १६ नक्षलवादी ठार झाले आहेत. तसेच नक्षलवाद्यांचा शोध घेण्यासाठी आक्रमकपणे शोधमोहीम हाती घेण्यात आली आहे.
सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत १६ नक्षलवाद्यांना ठार मारण्यात आलं आहे. तर या चकमकीत दोन जवानही किरकोळ जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार सुकमा जिल्ह्यात शनिवारी सकाळी सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू झाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही चकमक केरलापाल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका जंगलात झाली.
Belgaum Varta Belgaum Varta