नवी दिल्ली : पेट्रोल, डिझेल नंतर आता घरगुती गॅस सिलेंडर डायरेक्ट 50 रुपयांनी महागला आहे. आज रात्रीपासून नवी दरवाढ लागू होणार आहे. याचा थेट फटका सर्वसामान्य ग्राहकांना बसणार आहे. घरगुती गॅस सिलेंडर म्हागल्याने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार आहे.
घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरचे दर 50 रुपयांनी वाढले आहेत. उज्वला योजनेतील ग्राहकांना देखील ही गॅस सिलेंडरची दरवाढ लागू होणार आहे. सध्या मुंबईसह आसपासच्या शहरात घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरचे दर 802 रुपये आहेत. दरवाढ लागू झाल्यानंतर ग्राहकांना एका सिलेंडरसाठी 825 रुपये मोजावे लागणार आहेत. आज मध्यरात्री पासून ही दरवाढ लागू होणार आहे.