Saturday , June 14 2025
Breaking News

“खानापूर वाचवा, पाऊस वाचवा, शेतकरी वाचवा” बुधवारी महत्त्वपूर्ण बैठक

Spread the love

 

खानापूर : खानापूर तालुक्यातील शेतकऱ्यांवर स्वाधीनतेचे संकट कोसळले आहे. भांडुरा नाल्याचे पाणी धारवाड जिल्ह्यात मोठ्या पाईपद्वारे वळवण्यासाठी कर्नाटक सरकारने आखलेल्या योजनेमुळे खानापूर येथील सुपीक शेतीजमिनी सरकारकडून ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर “खानापूर वाचवा, पाऊस वाचवा, शेतकरी वाचवा” या घोषवाक्याखाली बुधवारी एक महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक बुधवार दिनांक ९ एप्रिल रोजी सकाळी १०.३० वाजता खानापूर बस स्टँडसमोर असलेल्या वागळे कॉलेज येथे होणार असून स्थानिक शेतकरी, पर्यावरणप्रेमी, आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. या बैठकीत पुढील लढ्याची दिशा, कायदेशीर पर्याय, पर्यावरणीय परिणाम आणि स्थानिक जनतेच्या हक्कांसंदर्भात चर्चा होणार आहे.

या प्रकल्पामुळे केवळ शेतकऱ्यांच्या जमिनींचे नुकसान होणार नाही, तर खानापूर भागात होणारा पाऊसही कमी होण्याचा धोका आहे. स्थानिक जंगलांची हानी, हवामानातील बदल, आणि वाढते वाळवंटीकरण – या सगळ्याचा परिणाम संपूर्ण उत्तर कर्नाटकावर होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

या मोहिमेमध्ये पुढील मान्यवर कार्यकर्ते सक्रिय आहेत:
श्री. दिलीप कामत, डॉ. शिवाजी कागणीकर, श्री. सुजित मुळगुंद, कॅप्टन नितिन धोंड, वकील नागप्पा लातूर, आणि इतर अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक.

सभेसाठी सर्व नागरिकांनी राजकीय, जातीय, आणि भाषिक भेद विसरून एकत्र यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क:
मराठी – कॅप्टन नितिन धोंड : 9986901212
कन्नड – सुजित मुळगुंद : 70261 27479

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव शहर परिसरात जोरदार पाऊस…

Spread the love  बेळगाव : गेल्या काही दिवसांपासून बेळगाव शहर आणि परिसरात तापमानात मोठी वाढ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *