
डॉमिनिकन रिपब्लिकमध्ये मंगळवारी (दि.8) रात्री मोठी दुर्घटना घडलीये. राजधानी सेंटो डोमिंगोमध्ये एका नाईट क्लबचा छत अचानक कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत 98 जणांचा मृत्यू झाला तर 160 जण गंभीररित्या जखमी असल्याची माहिती समोर येत आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, नाईट क्लबचा छत कोसळला तेव्हा 500 ते 1000 लोक उपस्थित होते. मात्र, छत कोसळू लागल्यानंतर क्लबमध्ये एकच खळबळ उडाली आहे. छत कोसळल्याने अनेक लोक ढिगाऱ्याखाली गाडले गेले. काहींचा अजूनही शोध सुरु आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारांसाठी हलवण्यात आले आहे.
आपत्कालीन ऑपरेशन सेंटरचे प्रमुख जुआन मॅन्युएल मेंडेझ म्हणाले की, ढिगाऱ्याखाली अजूनही बरेच लोक जिवंत असू शकतात असा आम्हाला विश्वास आहे. “प्रत्येकाला सुरक्षितपणे बाहेर काढेपर्यंत आम्ही प्रयत्न करत राहू’, असे त्यांनी स्पष्ट केले. मेंडेझ म्हणाले की, आतापर्यंत 44 जणांच्या मृत्यूची पुष्टी झाली आहे. अधिकाऱ्यांनी असेही सांगितले की, मृतांमध्ये मोंटेक्रिस्टीचे गव्हर्नर नेल्सी क्रूझ यांचाही समावेश आहे. याशिवाय, माजी मेजर लीग बेसबॉल खेळाडू ऑक्टाव्हियो डोटेलचाही यामध्ये मृत्यू झाला.
गायक रुबी पेरेझ हिचा मृत्यू
प्रसिद्ध मेरेंग्यू गायिका रुबी पेरेझ नाईट क्लबमध्ये परफॉर्म करत असताना ही घटना घडली आहे. त्यांचे व्यवस्थापक एनरिक पॉलिनो यांनी सांगितले की, रात्री 12 वाजताच्या सुमारास हा कार्यक्रम सुरू झाला आणि सुमारे एक तासानंतर नाईट क्लबचे छत कोसळले. या अपघातात गायिका रुबी पेरेझचाही मृत्यू झाला. मॅनेजर पॉलिनो म्हणाले, “हे सर्व अचानक घडले. सुरुवातीला मला वाटले की भूकंप झाला आहे. मी कसा तरी एका कोपऱ्यात जाऊन माझा जीव वाचवला.”
Belgaum Varta Belgaum Varta