Tuesday , March 3 2026
Breaking News

26/11 चा मास्टरमाईंड तहव्वूर राणाला भारतात आणले

Spread the love

 

नवी दिल्ली : 26/11 च्या हल्ल्याचा मास्टरमाईंड तहव्वूर राणाला भारतात आणण्यात आले आहे. तहव्वुर राणा याला आणणारे स्पेशल विमान इंडियन एअरस्पेसमध्ये दाखल झाले आहे. दिल्लीत हे विमान लँड झाले आहे. पालम विमानतळावरून त्याला एनआयएच्या हेडक्वॉर्टरला नेलं जाणार आहे. पालम विमानतळावर सुरक्षा यंत्रणांचा अभूतपूर्व बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. चार इनोव्हा, दोन सफारी, जॅमर, बॉम्ब विरोधी पथक या विमानतळावर दाखल आहे.

एनआयए मुख्यालयातील इन्व्हेस्टिगेशन सेलमध्ये केवळ 12 जणांना प्रवेश दिला जाणार आहे. हा सेल तिसऱ्या मजल्यावर तयार करण्यात आला आहे. ज्यांना प्रवेश दिला जाणार आहे, त्यामध्ये एनआयएचे डीजी सदानंद दाते, आयजी आशीष बत्रा आणि डीआयजी जया रॉय यांचा समावेश आहे.

दिल्ली पोलिसांनी मिळालेल्या इनपुटच्या आधारे सतर्कतेने काम सुरू केले आहे. मीडिया प्रतिनिधींना कोर्टमध्ये प्रवेश दिला जाणार नाही. एनआयए मुख्यालयासमोर सामान्य नागरिकांची वर्दळ थांबवण्यात आलेली आहे. एनआयएच्या समोर असलेले जवाहरलाल नेहरू मेट्रो स्थानकाचे गेट क्रमांक -2 देखील सुरक्षाच्या कारणास्तव बंद करण्यात आले आहे. दक्षिण विभागाचे डीसीपी एनआयए कार्यालयात पोहोचले आहेत आणि कार्यालयाबाहेरील सुरक्षा व्यवस्थेची पाहणी करत आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तहव्वुर हुसैन राणा सकाळी 9 ते 10 या वेळेत पोहोचण्याची शक्यता होती, मात्र इंधन भरण्यासाठी मध्ये एक थांबा घेण्यात आला. त्याला कुठून एनआयए मुख्यालयात आणायचे, याचा निर्णय शेवटच्या क्षणी घेतला जाईल. स्वॅट कमांडोंना अलर्टवर ठेवण्यात आले आहे. तहव्वुर हुसैन राणा याच्या एनआयए कोर्टातील हजेरीपूर्वी पटियाला हाऊस कोर्टाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

एनआयए सर्वात आधी तहव्वुर राणाला 26/11च्या हल्ल्याप्रकरणी अटक करेल. त्याला एनआयएच्या हेडक्वॉर्टरला आणलं जाईल. तिथे त्याची मेडिकल टेस्ट होईल. त्यानंतर त्याला कोर्टात हजर करून त्याची रिमांड मागितली जाईल.

तहव्वुर राणाला मोठ्या सुरक्षेतच एनआयएच्या हेडक्वॉर्टरला नेले गेले. या ठिकाणी अनेक लेअरची सेक्युरिटी तैनात करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांची अनेक वाहने राणाच्या ताफ्याला एस्कॉर्ट करतील. त्याला बुलेटप्रुफ गाडीतून नेले जात आहे.

About Belgaum Varta

Check Also

लग्नाला जाताना काळाचा घाला! वऱ्हाडींची बस दरीत कोसळून १३ जणांचा मृत्यू

Spread the love  उत्तराखंड : नेपाळ सीमेजवळ भयंकर रस्ते अपघात झाला. लग्नाला निघालेल्या वऱ्हाडींची बस …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *