नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील प्रमुख आरोपी आणि हिरे व्यापारी मेहुल चोक्सी याला बेल्जियम पोलिसांनी चोक्सी याला बेड्या ठोकल्या आहेत. भारत आता चोक्सी याच्या प्रत्यर्पणासाठी बेल्जियम सरकारकडे औपचारिक मागणी करणार असल्याचे सांगण्या येत आहे.
मेहुल चोक्सी आणि त्याचा भाचा नीरव मोदी यांच्यावर पीएनबीमधून १३,५०० कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. हा घोटाळा उघडकीस येण्यापूर्वीच २०१८ मध्ये चोक्सीने भारतातून पळ काढला होता. त्यानंतर तो अँटिग्वा आणि बार्बुडामध्ये लपून बसला होता. बेल्जियममधील अँटवर्प येथे पत्नी प्रीती चोक्सीसोबत राहत होता. सीबीआयच्या माहितीच्या आधारावर रविवारी बेल्जियम पोलिसांनी मेहुल चोक्सी याला बेड्या ठोकल्या आहेत. चोक्सी याच्या प्रत्यर्पण प्रक्रियेसाठी भारताने पावले उचलली आहेत. चोक्सीच्या वकिलांनी यापूर्वी त्याच्या प्रकृतीचे कारण देत प्रत्यर्पणाला विरोध केला होता. मात्र, आता अटकेमुळे भारतात आणता येणार आहे.