Sunday , April 27 2025
Breaking News

तब्बल 1800 कोटींचे ड्रग्ज पकडले; गुजरातच्या समुद्रात कारवाई

Spread the love

 

सुरत : गुजरातच्या समुद्रात कोस्ट गार्ड आणि गुजरात एटीएसच्या संयुक्त कारवाईत तब्बल 1800 कोटी रुपयांचा ड्रग्जसाठा असणारी बोट पकडली आहे. सुमारे 300 किलो एमडी ड्रग्ज या बोटीतून जप्त करण्यात आले आहेत. ही कारवाई महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमेवर समुद्रात करण्यात आली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,ही बोट रात्रीच्या अंधारात समुद्रातून पाकिस्तानच्या दिशेने भारतात येत होती, अशी प्राथमिक माहिती आहे. कोस्ट गार्डच्या स्पीड बोट्स आणि मोठ्या जहाजांनी सिनेमा स्टाईल कारवाई करत ही बोट थांबवली आणि तिची कसून तपासणी केली. बोटीत सापडलेली ड्रग्स ही मेथॅम्पेटामिन (एमडी ड्रग्स) असल्याचे समोर आले आहे. ही अत्यंत घातक आणि महागडी ड्रग आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या ड्रग्सची किंमत सुमारे 1800 कोटी रुपये आहे.

12 आणि 13 एप्रिल रोजी रात्री करण्यात आलेल्या या कारवाईत तटरक्षकाला रात्रीच्या काळोखात एक संशयित बोट जवळ येत असल्याचे आढळले. सतर्क झालेल्या तटरक्षकाने संशयित बोटीचा पाठलाग केला असता तटरक्षक दलाच्या पथकाला समुद्रात टाकण्यात आलेले अंमली पदार्थ आढळल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यानंतर जप्त केलेले अंमली पदार्थ पुढील तपासणीसाठी आयसीजी जहाजाने पोरबंदरला आणण्यात आले आहेत. त्यांनी गुजरात एटीएसच्या मदतीने ही ऑपरेशन राबवली. कारवाईदरम्यान बोटीत असलेल्या काही संशयितांना ताब्यात घेण्यात आलं आहे. त्यांची कसून चौकशी सुरू आहे.

About Belgaum Varta

Check Also

पाकिस्तानला सर्वांत मोठा धक्का! भारताकडून सिंधू जलवाटप कराराला स्थगिती

Spread the love  नवी दिल्ली : पहलगाम हल्ल्यानंतर भारत सराकरने कठोर निर्णय घेतला आहे. सरकारने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *